6 कोटी पीएफ खातेदारांसाठी खुशखबर ! मिळणार ‘जास्त’ व्याज, कुठल्याही क्षणी ‘नोटिफिकेशन’
नवी दिल्ली : वृत्तंसस्था – तुम्ही जर नोकरदार असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. भविष्य निर्वाह निधी खात्यावर मिळणाऱ्या व्याजासंबंधित मार्ग आता मोकळा झाला आहे. केंद्रीय मंत्री संतोष गंगवार यांनी माहिती दिली की, वित्त वर्ष 2018-19 च्या पीएफ वर 8.65 टक्के व्याज मिळेल. यासाठी वित्त मंत्रालय तयार आहे. वित्त मंत्रालय व्याज दरांचे नोटिफिकेशन लवकरच जारी करेल. याचा थेट फायदा 6 कोटी खातेधारकांना मिळणार आहे.
वित्त मंत्रालयच्या नोटिफिकेशनने काय होणार –
पीएफ व्याजदराबाबत बऱ्याच कालावधीपासून वित्त मंत्रालय आणि श्रम मंत्रालयात सहमती होत नव्हती. अखेर केंद्रीय मंत्री संतोष गंगवार यांनी सांगितले की, पीएफ खातेधारकांना 8.65 टक्के व्याज मिळेल. यानंतर लवकर यासंबंधित नोटिफिकेशन जारी करण्यात येईल.
पुढील आठवड्यात व्याजदराचे नोटिफिकेशन येण्याची शक्यता –
बऱ्याच दिवसापासून वित्त मंत्रालय आणि श्रम मंत्रालयात सहमती होत होती. संतोष कुमार गंगवार आणि वित्तमंत्री निर्मला सितारामन यांच्यात या मुद्यावर बैठक झाली. यानंतर पीेएफ संबंधित व्याजदरावर सहमती मिळाली आहे अशी माहिती मिळत आहे. पुढील आठवड्यात नोटिफिकेशन येऊ शकते. यानंतर पीएफ खातेधारकांना व्याज क्रेडिट करुन मिळेल.
- फक्त २ अक्रोडने मोकळ्या होतील शरीरातील सर्व नसा, अशाप्रकारे करा वापर
- वजन वाढण्याची चिंता आहे का ? ‘हे’ ५ पदार्थ बिनधास्त खा, वाढणार नाही वजन
- स्मोकिंग सोडल्याच्या २० मिनिटापासून ‘ते’ १० वर्षानंतर शरीरावर असा होतो परिणाम
- आपल्या बेबीसाठी सर्वात चांगले तेल कसे निवडावे ? जाणून घ्या माहिती
- हरड, बहेला, आँवला, घी सक्कर में खाए ! हाथी दाबे काँख मे, साठ कोस ले जाए !!
- तांदळाच्या पाण्याने चेहरा धुतल्याने होतात मोठे फायदे, तुम्हीही करून पहा
- पार्टीनंतर होणारा हँगओव्हर दूर करण्यासाठी मदत करतील ‘हे’ 9 उपाय
- दही-भात खाण्याचे ५ मोठे फायदे, तुम्हीसुध्दा अवश्य ट्राय करून पहा