21 हजार पगार असणार्‍यांना सरकार देणार ‘ही’ नवी सुविधा, घर बसल्या घेऊ शकणार फायदा, जाणून घ्या

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था – श्रममंत्री संतोष गंगवार म्हणाले की, कर्मचारी राज्य विमा मंडळ (ESI) च्या लाभार्थ्यांच्या विविध तक्रारींच्या निवारणासाठी त्यांचे मंत्रालय संतुष्ट नावाचे मोबाइल अ‍ॅप सुरु करणार आहे. केंद्रीय मंत्र्यांनी कर्मचारी राज्य विमा मंडळाच्या स्थापना दिवशी ही माहिती दिली. यावेळी ते म्हणाले की 24 फेब्रुवारीपासून 10 मार्चपर्यंत विशेष पखवाडा सुरु झाला आहे. या कार्यक्रमात रोज आरोग्य तपासणी शिबिर, वीमाधारक व्यक्तींची अनेक वर्ष अडून राहिलेली बिले, तक्रारींचे समाधान यासाठी विशेष शिबीर सुरु केले जाईल. यावेळी नवी दिल्लीतील बसईदारापूरमधील ईएसआयसी हॉस्पिटलचे नाव बदलून साहिब सिंह वर्मा ईएसआयसी रुग्णालय करण्यात आले. याशिवाय ईएसआयसी आयुष रुग्णालय नाव बदलून पद्म विभूषण बृहस्पती देव त्रिगुना रुग्णालय करण्यात आले.

पेंशन कम्युटेशन सुविधा
श्रम मंत्रालयाने कर्मचारी भविष्य निर्वाह संघटनेने कर्मचारी पेंशन योजनेंतर्गत पेंशन कोषमधून आंशिक रक्कम काढण्याची सुविधा लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे 6.3 लाख पेंशनधारकांना लाभ होईल. पेंशन कम्युटेशनअंतर्गत अंशधारकांना अग्रिम स्वरुपात पेंशन कोषमधून आंशिक रक्कम काढण्याची सुविधा मिळेल. या सुविधेचा लाभ घेतल्यास पेंशनची रक्कम 15 वर्ष घट करुन मिळणाऱ्या रक्कमेऐवढी मिळेल.

श्रम मंत्रालयाने ईपीएफओच्या 25 सप्टेंबर 2008 ला आणि यापूर्वी पेंशन कोषमधून आंशिक रक्कम काढण्याच्या सुविधेचा लाभ घेण्यासाठी पेंशनधाराकांना पेंशन देण्याच्या निर्णयासंबंधित अधिसूचना 20 फेब्रुवारीला दिली. पेंशन कम्युटेशनअंतर्गत पेंशनमध्ये पुढील 15 वर्षांपर्यंत कपात होईल आणि कपात केलेली रक्कम एकत्र दिली जाईल. 15 वर्षांनंतर पेंशनधारक पूर्ण रक्कमेच हक्कदार असतील.