1 दिवसात तुम्ही ऑफिसमध्ये जास्तीत जास्त किती काम केले पाहिजे ? सरकारचा ‘हा’ आहे प्रस्ताव

नवी दिल्ली : वृत्त संस्था  – कामगार मंत्रालयाने संसदते नुकत्याच संमत झालेल्या एका संहितेमध्ये कामाचे तास वाढवून कमाल 12 तास प्रतिदिवस करण्याचा प्रस्ताव दिला आहे. सध्या कामाचा दिवस कमाल आठ तासांचा असतो.

ओएसएच कोडमध्ये बदलाची तयारी
मंत्रालयाने व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य आणि कामाच्या अटी म्हणजे ओएसएच कोड 2020 च्या नियमांतर्गत प्रस्ताव सादर केला आहे. नवीन कार्य कालावधीत अल्पकालिक सुटी (इंटरव्हल) सुद्धा सहभागी आहे. मात्र, 19 नोव्हेंबर 2020 च्या अधिसूचित या मसुद्यात साप्ताहिक कामाच्या तासांना 48 तास कायम ठेवले आहे. सध्या तरतूदीमध्ये 8 तासाच्या कार्यदिवसात कार्य आठवडा 6 दिवसाचा असतो, ज्यामध्ये एक दिवसाची सुटी असते.

सामाजिक सुरक्षेत यशस्वी होईल निर्णय
कामगार मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकार्‍यानुसार, हे भारताची विषम जलवायु स्थिती लक्षात घेऊन केले आहे, जेथे काम पूर्ण दिवसात विभागलेले असते. यामुळे श्रमिकांना ओव्हरटाइम भत्त्याच्या माध्यमातून जास्तीची कमाई करण्याची सुविधा मिळेल. आम्ही मसुदा नियमात आवश्यक तरतुद केली आहे, जेणेकरून आठ तासांपेक्षा जास्त काम करणार्‍या सर्व मजूरांना ओव्हर टाइम मिळू शकतो.

मजूरांना ओव्हर टाइममध्ये आता जास्त लाभ
ओएसएच संहितेच्या मसुद्यातील नियमांनुसार, कोणत्याही दिवशी ओव्हरटाइमच्या गणनेत 15 ते 30 मिनिटांच्या वेळेला आता 30 मिनिटेच मोजले जाईल. सध्या व्यवस्थेत 30 मिनिटापेक्षा कमी गिणतीत ओव्हरटाइम मानले जात नाही.

48 तासापेक्षा जास्त काम करून घेऊ शकत नाही कंपनी
मसुद्याच्या नियमात म्हटले आहे की, कोणत्याही कामगाराला एका आठवड्यात 48 तासापेक्षा जास्त कोणत्याही संस्थेत काम करण्याची आवश्यकता असणार नाही आणि असे करण्याची परवानगी नसेल. कामाच्या तासांचे अशाप्रकारे व्यवस्थापन करावे लागेल की, मध्येच आरामासाठी मध्यंतरासह कोणत्याही दिवशी कामाचे तास 12 पेक्षा जास्त असू नयेत.

कामगारांच्या सवलतींकडे विशेष लक्ष
मसुद्यानुसार, कुणीही व्यक्ती किमान अर्ध्या तासाच्या मध्यंतराशिवाय पाच तासापेक्षा जास्त सलक काम करणार नाही. आठवड्याच्या हिशेबाने दररोज कामाचे तास अशा प्रकारे ठरवले जातील की, संपूर्ण आठवड्यात 48 तासांपेक्षा जास्त नसतील.

नुकतेच केंद्रीय कामागार मंत्रालयाने सामाजिक सुरक्षा संहिता, 2020 चा मसुदा अधिनियम अधिसूचित करताना हरकती आणि सूचना मागवल्या आहेत.