पाकिस्तानात स्वातंत्र्य नाही, ‘या’ महान क्रिकेटरचं मोठं वक्तव्य !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तानचे संघाचे गोलंदाजीची माजी प्रशिक्षक ग्रांट फ्लॉवर यांनी एक खळबळजनक विधान केले आहे. पाकिस्तान बाबत टिप्पणी करताना ते म्हणतात, ‘पाकिस्तानात स्वातंत्र्य नाही आणि सुरक्षेच्या दृष्टीकोनातून पाहिलं तरी पाकिस्तान हा देश सुरक्षित नाही’. फ्लॉवर २०१४ पासून पाकिस्तानी क्रिकेट संघाचे प्रशिक्षक होते.

एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत फ्लावर यांनी पाकिस्तानी संघासोबतचे आपले अनुभव सांगितले. पाकिस्तानात राहताना कुठली गोष्ट सर्वाधिक तापदायक होती. असं विचारता त्यांनी सुरक्षितता आणि स्वातंत्र्याच्या संकोचाचा मुद्दा उपस्थित केला. पाकिस्तानने कोच पदाचे त्यांचे कंत्राट संपल्यानंतर त्यांना मुदतवाढ दिलेली नाही.

पाकिस्तानात काही वर्षांपासून खूपच थोडे विदेशी संघ क्रिकेट खेळण्यासाठी आले होते. कारण २००९ ला या ठिकाणी क्रिकेट खेळण्यासाठी आलेल्या श्रीलंकन संघावर दहशतवादी हल्ला झाला होता. यावेळी फ्लॉवर यांनी पाकिस्तानातील माजी खेळाडूंचे मागे राजकारण करणे आणि टी व्ही वाहिन्यांवर सुरु असलेले राजकारण या गोष्टींची मला बिल्कुलही आठवण नको असे फ्लॉवर यांनी सांगितले.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like