Lack of Sleep | झोपेच्या कमतरतेमुळे पुरुषांना होतात ‘या’ लैंगिक समस्या, वैवाहिक जीवन होऊ शकते खराब

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Lack of Sleep | पुरेशी झोप घेणे शारीरीक आणि मानसिक आरोग्यासाठी खुप आवश्यक आहे. जे लोक पूर्ण झोप घेत (Sleep apnea or Insomnia) नाहीत, त्यांच्यात अनेक शारीरीक आणि मानिसक समस्या निर्माण होतात. इतकेच नव्हे, झोप (Lack of Sleep) पूर्ण न झाल्याने पुरुषांचे सेक्श्युअल लाईफ सुद्धा खराब होऊ शकते आणि ते अनेक गंभीर लैंगिक समस्यांमध्ये अडकतात. या सेक्श्युअल समस्यांमुळे (Problems in Men due to sleep) पुरुषांचे वैवाहिक जीवन (Married Life) खराब होऊ शकते.

झोपेसाठी आवश्यक टिप्स (tips for sleep)

झोपण्यापूर्वी 2 तास अगोदर गॅझेट्स वापरणे बंद करा

खोलीत अंधार आणि शंतता ठेवा

नियमित एक्सरसाईज करा

रात्री जास्त जेवण करू नका

कॉफी, चहा पिणे टाळा

नियमित योगा करा

झोपेच्या कमतरतेमुळे होणार्‍या समस्या (Problems of sleep deprivation)

1. सेक्श्युअल ड्राइव्हमध्ये कमतरता (Problems with sleep deprivation)
लैंगिक जीवनासाठी संतुलित आणि निरोगी सेक्श्युअल ड्राईव्ह म्हणजे कामेच्छा होणे आवश्यक आहे. जर्नल ऑफ सेक्श्युअल मेडिसिनवर 2015 मध्ये प्रकाशित एका संशोधनानुसार, जे पुरुष दर रात्री एक तास जास्त झोप घेतात, ते आपल्या पार्टनरसोबत 14 टक्के जास्त लैंगिक संबंध ठेवतात. जे लोक पूर्ण झोप घेत नाहीत, त्यांच्या मूडमधील चढ-उतारामुळे कामेच्छा कमी होते.

2. टेस्टोस्टेरॉनची कमतरता (Testosterone deficiency)
पुरुषांचे लैंगिक जीवन टेस्टोस्टेरोन हॉर्मोनच्या स्तरावर (Low Testosterone in Men) अवलंबून असते. हेच हार्मोन पुरुषांच्या फर्टिलिटीसाठी सुद्धा जबाबदार असते. अपुरी झोप पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरोन हॉर्मोनचा स्तर 10 ते 15 टक्के कमी करते. प्रौढांवरील प्रयोगातून हे सिद्ध झाले आहे.

3. कमी झोपेमुळे लिंगाची ताठरता (इरेक्शन) कमी होते (Less sleep reduces erection)
जोडीदारासोबत शारीरीक संबंध ठेवण्यासाठी पुरुषांना लिंगात योग्य ताठरतेची (इरेक्शन) आवश्यकता असते. परंतु झोपेच्या कमतरतेमुळे टेस्टोस्टेरॉन आणि ऑक्सीजनच्या कमतरतेमुळे पुरुषांच्या लिंगात योग्य ताठरता येऊ शकत नाही. ज्यास इरेक्टाईल डिस्फंक्शन म्हटले जाते. शरीरात टेस्टोस्टेरॉनचा स्तर आणि ऑक्सीजनचा प्रवाह लिंगाच्या ताठरतेसाठी आवश्यक आहे.

4. स्पर्म काऊंट कमी होतो (Decreases sperm count)
झोपेच्या कमतरतेमुळे केवळ कामेच्छा, टेस्टोस्टेरॉन किंवा लिंगाच्या ताठरतेवरच परिणाम करत नाही, तर यामुळे पुरुषांच्या स्पर्म काऊंटमध्ये सुद्धा घसरण होते. पुरुषांची फर्टिलिटी स्पर्म काऊंट आणि क्वालिटीवर अवलंबून असतो. अमेरिकन जर्नल ऑफ एपिडेमियोलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या एका रिसर्चनुसार झोपेच्या कमतरतेमुळे पुरुषांच्या शुक्राणूंची संख्या कमी होऊ शकते. संशोधनात आढळून आले की, जे लोक कमी झोपत होते, त्याच्या स्पर्म क्वालिटीमध्ये घसरण दिसून आली.

Web Title :- lack of sleep causes many sexual problems in men

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Weak Sperm | प्रेग्नंसी रोखणारी गर्भनिरोधक अँटीबॉडी, 15 सेकंदात स्पर्मला करेल कमजोर – स्टडी

Closed Currency | 2 रुपयांचे ‘हे’ नाणे बदलू शकते तुमचे नशीब, मिळू शकतात लाखो रुपये; जाणून घ्या कसे

Pune Police | गहाळ झालेले मंगळसूत्र सहकारनगर पोलिसांच्या प्रयत्नाने परत