India China Faceoff : 1962 मध्ये चीन भारताविरूध्द जिंकला पण यावेळी घाम फूटणार, जाणून घ्या ‘हे’ 15 मुद्दे

पोलीसनामा ऑनलाइन – 1962 मध्ये भारत आणि चीनमध्ये युद्ध झाले तेव्हा दोन्ही देश अण्वस्त्र सज्ज नव्हते. आजच्या घडीला भारत आणि चीन दोघेही अण्वस्त्रांनी सज्ज आहेत. 58 वर्षांनंतर भारत आणि चीन सैन्य शक्तीच्याबाबतीत खुप पुढे गेले आहेत. दोन्ही देशांचे सैन्य जगातील एक मोठे आणि मजबूत सैन्य म्हणून ओळखले जाते. डोकलाम वादाच्या वेळी तत्कालीन संरक्षण मंत्री अरूण जेटली यांनी चीनला सुनावताना म्हटले होते की, भारत 1962 पासून खुप पुढे निघून गेला आहे, यासाठी चीनने कोणताही गैरसमज बाळगू नये.

किती भीषण होईल हे युद्ध?
मागील तीन महिन्यांपासून भारत आणि चीनच्या दरम्यान लडाखमध्ये सीमेवर तणाव आहे. 15 जूनला 45 वर्षानंतर दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये हिंसक हाणामारी झाली होती आणि यामध्ये भारताचे 20 सैनिक शहीद झाले. तेव्हापासून तणाव कायम आहे आणि मागच्या आठवड्यात पुन्हा दोनवेळा दोन्ही सैन्यात संघर्ष झाला आहे. भारताकडून चीफ ऑफ डिफेंस स्टाफ आणि माजी लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी म्हटले आहे की, जर चीनसोबत प्रकरण चर्चेने सुटत नसेल तर सैन्य पर्याय उपलब्ध आहे. अशा स्थितीत दोन्ही देश युद्धाकडे वळले तर हे युद्ध 1962 पेक्षा खुप वेगळे आणि भीषण असणार आहे.

जर दोन्ही देश भिडले तर शंका या गोष्टीची आहे की, चीनच्या सोबत पाकिस्तान येऊ नये. चीनसोबत तणाव जम्मू-काश्मीरमध्ये कलम 370 हटवल्यानंतर वाढला आहे. यावरून चीन आणि पाकिस्तानचा आक्षेप होता. त्यामुळे भारताच्याविरूद्ध लडाखमध्ये चीनच्या सोबत सध्या पाकिस्तानसुद्धा जोडलेला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी म्हटले आहे की, त्यांच्या देशाचे भविष्य आता चीनसोबत आहे. भारताला या गोष्टीचा अंदाज आहे की, चीनसोबत युद्धा होण्याच्या स्थितीमध्ये पाकिस्तानसाठी सुद्धा तयार राहावे लागणार आहे.

सीडीएस बिपिन रावत जेव्हा लष्कर प्रमुख होते तेव्हा त्यांनी म्हटले होते की, भारत अडीच आघाड्यांवर युद्धासाठी तयार आहे. उघड आहे की, अडीच आघाड्यांमध्ये पाकिस्तानचा सुद्धा समावेश आहे. 1962 च्या युद्धा पाकिस्तान तटस्थ होता. पण असेही म्हटले जात आहे की, अमेरिकेने त्याला रोखले होते. परंतु, तीन वर्षानंतर पाकिस्तानने हा विचार करून भारतावर 1965 मध्ये हल्ला केला होता की, चीनकडून झालेल्या पराभवानंतर भारताच्या सैन्याचे मनोबल खचलेले असेल. मात्र, पाकिस्तानचा हा अंदाज पूणपणे चुकीचा ठरला आणि त्याला पराभवाची धूळ चाखावी लागली होती.

भारत आणि चीन सीमारेषा स्पष्ट नाही आणि यासाठी दोन्ही देशांमध्ये वेळोवेळी वाद उभे राहात आहेत. भारत आणि चीनच्या दरम्यान सीमा पँगोंग सरोवराजवळ झाला आहे. इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर स्ट्रॅटिजिक स्टडीजमध्ये दक्षिण आशिया प्रकरणांचे जाणकार अँटोनी लेवेक्स यांनी सीएनएनला सांगितले की, पँगोंग सरोवर दोन्ही देशांसाठी सैन्याच्या दृष्टीने खुप महत्वाचे आहे, परंतु दोन्ही देशांचे सैन्य विकासकाम आणि गस्तीच्या कामाला लागले आहे.

लेवेक्स यांचे म्हणणे आहे, चीनसाठी याचे लष्करी महत्व नसले तरी या भागावर नियंत्रणामुळे चीनला रणनितीचा फायदा जरूर होईल. 1962 मध्ये सुद्धा पँगोंग सरोवरात युद्धा झाले होते आणि भारताचा 62 च्या युद्धात पराभव झाला होता, या करता चीनसाठी या जागेचे सांकेतिक महत्व महत्वाचे आहे. भारत आणि चीनमध्ये सध्याच्या वादात आक्रमक परराष्ट्र नितीसुद्धा कारणीभूत आहे. चीनी राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्या शासनकाळात चीन हिमालय, दक्षिण चीन समुद्रावर सुद्धा दावा करत आक्रमक आहे. तैवान आणि हाँगकाँगबाबत सुद्धा चीन खुपच आक्रमक आहे.

पीएम मोदी सुद्धा आक्रमक
दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानसह चीनच्या बाबतीत सुद्धा आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी चीनच्या अनेक अ‍ॅपवर बंदी घातली आहे. तसेच मोदी सरकारने काश्मीरमधून जेव्हा कलम 370 हटवले तेव्हा पाकिस्तानसह चीनने सुद्धा कठोर प्रतिक्रिया दिली होती. चीनने संयुक्त राष्ट्रात सुद्धा पाकिस्तानकडून काश्मीर मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न केला होता. संसदेत गृहमंत्री अमित शाह यांनी स्पष्टपणे सांगितले होते की, अक्साई चिनसुद्धा भारताचा भाग आहे. आता अक्साई चीनवर चीनचे नियंत्रण आहे.

चीनची पाकिस्तानमध्ये गुंतवणुक
विश्लेषकांचे म्हणणे आहे की, या भागात भारताचा विस्तार किंवा मजबूत होणे चीनच्या पश्चिम आशियात रणनिती लक्ष्यासाठी धोकादायक ठरू शकते. चीनने पाकिस्तानमध्ये सीपीईसीमध्ये 60 अरब डॉलरपेक्षा जास्त गुंतवणूक केली आहे, जी काश्मीरच्या वादग्रस्त क्षेत्रापासून जाते. हा शी जिनपिंग यांच्या बेल्ट अँड रोड योजनेचा महत्वाचा भाग आहे. हे सर्व घटनाक्रम जूनमध्ये झालेल्या संघर्षाची सुरूवात करत होते. भारताचा कोरोनावरून प्रथमपासूनच चीनवर आक्रोश होता, जो लडाख हिंसक संघर्षानंतर आणखी वाढला. यानंतर भारत अमेरिकेची जवळीक वाढली आणि ती चीनला अस्वस्थ करत आहे.

भारत-अमेरिकेची जवळीक
रणनीती प्रकरणांचे जाणकार मायकेल कुगलमन म्हणतात, अमेरिका चीनचे संबंध कोणत्याही युद्धाशिवाय जेवढे खराब होऊ शकतात, तेवढे आहेत तर भारत-अमेरिकेचे नाते मजबूत झाले आहे. लडाख संघर्ष पाहता चीन हा अमेरिका आणि भारत दोघांनाही कठोर संदेश देण्याचा प्रयत्न करत आहे. जर तुम्ही सोबत असाल तर दोघांना मागे जावे लागेल.

अणू धोका
भारत आणि चीनमध्ये जर युद्ध झाले तर त्यावर अण्वस्त्राचा धोका सतत टांगलेला असणार आहे. भारत आणि चीनमध्ये वादग्रस्त सीमाभागात शस्त्र न घेऊन जाण्यावर सहमती झाली आहे यासाठी जून महिन्यात झालेल्या हिंसक संघर्षात हाणामारी आणि काटेरी तारांच्या काठ्यांचा वापर करण्यात आला. मात्र, संघर्षानंतर भारत आणि चीन दोन्ही देश आपल्या भागात सैन्य वाढवत आहेत आणि मिसाईल व अन्य शस्त्र जमवत आहेत.

कुणाकडे किती अणूबॉम्ब?
स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट नुसार, भारत आणि चीन दोन्ही देशांनी मागील एका वर्षात आपल्या अण्वस्त्रांची संख्या वेगाने वाढवली आहे. सिपरीच्या 2020 च्या रिपोर्टनुसार, चीन आणि पाकिस्तानच्या तुलनेत भारताकडे कमी अणूबॉम्ब आहेत. भारताकडे 150 अणूबॉम्ब आहेत, तर चीनकडे 320 आणि पाकिस्तानकडे 160 अणूबॉम्ब आहेत. चीनचे 240 अणूबॉम्ब चीनच्या बॅलेस्टिक मिसाइल आणि न्यूक्लियर एयरक्राफ्टसाठी देण्यात आले आहेत. याची कल्पनासुद्धा केली जाऊ शकत नाही की युद्धात जर या अण्वस्त्रांचा वापर झाला तर विध्वंस किती भयंकर असू शकतो.

तीन आघाड्यांवर करू शकतो अण्वस्त्र हल्ला
भारताकडे तीन आघाड्यांवरून अणूहल्ला करण्याची क्षमता आहे, म्हणजे भारत जमीन, आकाश आणि समुद्र या तीन माध्यमातून अणू युद्ध लढण्याची क्षमता बाळगून आहे. 2018 मध्ये भारताची अणूशक्ती संपन्न पाणबुडी आयएनएस अरिहंतचा लष्करात समावेश झाल्यानंतर भारताची ताकद वाढली आहे. भारताची अणू पाणबुडी आयएनएससाठी 12 अणूबॉम्ब रिझर्व्ह आहेत.

एयरक्राफ्टची ताकद अशी आहे
एसआयपीआयआरच्या रिपोर्टनुसार, भारतसुद्धा आपली अण्वस्त्र वाढवण्यासह इन्फ्रास्ट्रक्चरचा विकास करत आहेत. भारताच्या अणूशक्तीचा सर्वात महत्वाचा भाग एयरक्राफ्ट आहे. सिपरीनुसार, एयरक्राफ्टसाठी 48 अणूबॉम्ब रिझर्व्ह आहेत. थिंक टँक सिपरीने आपल्या रिपोर्टमध्ये सांगितले होते की, चीन प्रथमच न्यूक्लियर ट्रायड म्हणजे जमीन, समुद्र आणि हवेतून मारा करणार्‍या मिसाईलचा विकास करत आहे. चीन आपल्या अण्वस्त्रांचे अधुनिकीकरण करण्याच्या प्रक्रियेत गुंतला आहे. चीन आता पहिल्यापेक्षा जास्त आपल्या अणूशक्तीचे प्रदर्षण करतो.

भारताचे संरक्षण बजेट अतिशय कमी
चीनचे संरक्षण बजेट 2020 मध्ये 179 अरब डॉलर आहे. तर भारताचे संरक्षण बजेट अवघे 70 अरब डॉलरचे आहे. भारतीय लष्करात अ‍ॅक्टिव्ह जवानांची संख्या 14.44 लाख आणि 21 लाख रिझर्व्हमध्ये आहे. तर, चीनकडे 21.83 लाख अ‍ॅक्टिव्ह आणि 5.10 लाख रिझर्व्ह जवान आहेत. भारताकडे 4292 लढाऊ रणगाडे, 8686 लढाऊ वाहने, स्वयंचलित आर्टिलरी 235, फील्ड आर्टिलरी 4060 आणि रॉकेट लाँचर्स 266 आहेत. तर, चीनकडे 3500 लढाऊ रणगाडे, 33 हजार लढाऊ वाहने, 3800 स्वयंचलित आर्टिलरी, 3600 फील्ड आर्टिलरी आणि 2650 रॉकेट लाँचर्स आहेत. एकुण मिळून, भारत आणि चीनकडे भरपूर शस्त्र आहेत, जी युद्धात धोकायदायक ठरू शकतात.

सर्वात भयावह संघर्ष
कार्नीज अँडोमेंट फॉर इंटरनॅशनल पीसचे विश्लेषक टोबी दाल्टन आणि तोंग झाओ यांचे म्हणणे आहे की, भारत आणि चीनमध्ये मागील 50 वर्षातील हा सर्वात गंभीर संघर्ष आहे. त्यांनी लिहिले, जर दोन्ही शक्तीशाली देश एक मोठ्या प्रतिस्पर्धी युगात प्रवेश करत आहेत तर एक प्रश्न निर्माण होतो की, अण्वस्त्रांची यामध्ये भूमिका महत्वाची असणार आहे, कारण प्रत्येक देश दुसर्‍या देशाची वागणूक सुधारताना दिसत आहे.

चीन-भारतामध्ये मोठा वाद
भारत आणि पाकिस्तानमध्ये जेव्हा मोठा वाद होतो, तेव्हा अण्वस्त्रांचा उल्लेख होतो, परंतु भारत-चीनच्या प्रकरणात असे नाही. सार्वजनिकदृष्ट्या दोन्ही देश वादामध्ये कधीही अण्वस्त्रांचा उल्लेख करत नाहीत. दाल्टन आणि झाओ यांच्यानुसार, 2020च्या सीमा वादासह तमाम वादामध्ये अण्वस्त्रांची पार्श्वभूमी राहिली आहे. मात्र दोन्ही देश आपली अण्वस्त्र सुसज्ज करण्याच्या प्रयत्नात आहेत आणि आपली पारंपारिक सैन्यक्षमता वाढवत आहेत. अशामध्ये एक गंभीर प्रश्न आहे की, दोन्ही देश अण्वस्त्रांचा वापर न करण्याच्या आपल्या नीतीवर कायम राहू शकतील का.

भारताला सहजपणे घेत आहे चीन
त्यांनी या गोष्टीवर चिंता व्यक्ती केली की, चीनची अणू नीती अमेरिकेला काऊंटर करण्यावर केंद्रीत आहे आणि भारताकडून आपल्या हालचालीवर होत असलेल्या प्रतिक्रियांकडे दुर्लक्ष करत आहे. भारत चीनच्या अणूशक्तीबाबत जाणून आहे आणि याकडे एक धोका म्हणून पहात आहे आणि हळुहळु आपली अणू क्षमता वाढविणे भारताला आपली रणनीती क्षमता आणि अणूसाठा मजबूत करण्यासाठी प्रेरित करत आहे. अण्वस्त्रांची शर्यत भारत-चीनच्या संघर्षाला भारत-पाकिस्तानमध्ये झालेल्या युद्धाचे रूप देऊ शकते, ज्यामध्ये अणू युद्धाचा धोका कायम राहणार आहे.

सरकारी मीडियाची वाचाळपणा
चीनला भरताकडून कोणताही धोका जाणवत नाही आणि त्याची ही भूमिका चीनच्या सरकारी मीडियातून देखील स्पष्ट होते. चायना डेलीने मंगळवारी लिहिले, चीनच्या सीमेवर भारताने भडकावण्याच्या हालचाली केल्याने तसेच दोन्ही देशांचे खराब होत असलेल्या संबंधामुळे त्या देशांना आनंद मिळाला असेल जे चीनला काऊंटर करण्याच्या आपल्या रणनीतीमध्ये भारताला मोहरा बनवत आहेत. परंतु, जर भारताच्या भडकावण्याच्या हालचालींमुळे युद्ध झाले तर भारताने या देशांकडून कोणत्याही प्रकारच्या मदतीची अपेक्षा ठेवू नये.

भारताने किंमत चुकवण्यासाठी तयार राहावे
ग्लोबल टाइम्सच्या एका संपादकीय लेखात भारतातील आर्थिक अडचणींवर आणि कोरोना व्हायरसच्या स्थितीवर सविस्तर चर्चा करण्यात आली आहे. यामध्ये हे सुद्धा म्हटले आहे की, भारताचा चीनसोबतचा वाद या गोष्टीचा पुरावा आहे की, अति राष्ट्रवादाचा देखावा त्यांच्यासाठी घातक ठरू शकतो. चीन भारताचा शक्तीशाली शेजारी आहे आणि यापासून कुणीही पळू शकत नाहीत. दोन्ही देश सोबत मिळून विकास करू शकतात, परंतु जर भारत चीनला आपला शत्रू बनवत असेल तर त्यास मोठी किंमत चुकवण्यासाठी तयार राहावे लागेल. हे देखील चित्र स्पष्ट आहे की, भारत कधीही एक इंच जमीनीवर सुद्धा कब्जा करू शकणार नाही.

भारत डोळे बंद करून अमेरिकेच्या मार्गावर
एका अन्य लेखात ग्लोबल टाइम्सने शंघाय इन्स्टिट्यूट फॉर इंटरनॅशनल स्टडीजच्या साऊथ आशिया स्टडीजचे प्रमुख वांग देहुओ यांचा संदर्भ देत म्हटले आहे की, चीनसोबत वाद वाढवून भारत डोळे बंद करून अमेरिकेने सांगितलेल्या मार्गावर चालत आहे. चीनला वाटते की, जर भारत-चीनमध्ये असा संघर्ष झाला तर 1962 च्या प्रमाणे विजय चीनचाच होईल. मात्र, 1962 चे युद्ध दोन अगदी वेगळ्या देशांमध्ये लढले गेले होते त्यावेळी कोणताही देश अणूसंपन्न नव्हता. आता स्थिती बदलली आहे आणि कोणत्याही नव्या संघर्षाचे परिणाम 1962 पेक्षा खुप जास्त भीषण असतील.