तिरुपती मंदिरात लाडवांची अफरातफरी

तिरुमला : वृत्तसंस्था – देशापरदेशातून तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी भाविक तिरुमलाला येत असतात. या भाविकांसाठी प्रसाद म्हणून लाडु दिला जातो. तिरुपतीला आलेले भाविक प्रसाद म्हणून अनेक लाडु विकत घेऊन जात असतात. अत्यंत चविष्ट आणि सुक्या मेव्याचा भरणा असलेला हा लाडु सर्वांना खूपच प्रिय आहे. अशा या लाडवातही अफरातफर झाल्याचे उघड झाले आहे. तेथील विक्रेत्यांनी चक्क कुपनाच्या झेरॉक्स काढून त्याद्वारे लाडु पळविले व मंदिराच्या बाहेर दुप्पट किंमतीला विकल्याचे पुढे आले आहे.

नवरात्रीच्या ब्रह्मोत्सवामध्ये तिरुपती बालाजीच्या मंदिरात १४ हजार लाडवांच्या विक्रीत हा घोळ झाला आहे. या लाडवांचा शोध घेण्यात येत असून मंदिराच्या चौकशी समितीकडून विक्रेत्यांची चौकशी करण्यात येत आहे.

नवरात्रीच्या निमित्ताने भाविकांसाठी लाडवांचा प्रसाद ठेवण्यात आला होता आणि त्यासाठी १०० रुपये आणि ५० रुपयांचे कुपनही देण्यात आले होते. भाविकांकडून कुपन घेऊन विक्रेते त्यांना लाडू देत होते. मात्र काही विक्रेत्यांनी कुपनच्या झेरॉक्स प्रती काढल्या आणि लाडू पळविले व मंदिराच्या बाहेर दुप्पट किमतीला विकले. या प्रकाराची माहिती मंदिर समितीला मिळाली. त्यानंतर मंदिर समितीने चौकशी केली असता तब्बल १४ हजार लाडवांची अफरातफर झाल्याची बाब समोर आली. या प्रकरणी संबंधित विक्रेत्यांना ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.

दहावीतील भाषा विषयासाठीचे २० गुण बंद, शिक्षण मंडळाचा निर्णय