रुग्ण महिलेची खाणीत उडी घेऊन आत्महत्या

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – चिखली, शिवतेजनगर येथील पाण्याच्या खाणीत एका वृद्ध महिलेने उडी घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार सोमवारी घडला. या मानसिक रुग्ण असल्याने यातून हे कृत्य केले असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

महादेवी सांब कोरे (72, रा. जयमहाराष्ट्र सोसायटी, शाहूनगर, चिचवड, पुणे) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महादेवी या गेली तीन वर्षांपासून मानसिक रुग्ण असल्याचे त्यांच्या मुलाने सांगितले. त्यांच्यावर डि.वाय.पाटील रुग्णालयात उपचार सुरु होते. महादेवी या काही दिवसांपूर्वी मी पाण्यात उडी टाकनार असे मुलाला म्हणत होत्या. आज त्यांनी खाणीत उडी मारली. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे. तपास चिखली पोलीस करत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा –