Ladki Bahin Yojana | लाडकी बहिणच्या भरघोस यशानंतर आता राज्यसरकारची लाडकी मोलकरीण योजना; घरकाम करणाऱ्या महिलांना १० हजारांचा लाभ?

Maharashtra Assembly Election 2024 | mahayuti arrange strategy for balapur constituency in state legislative assembly elections 2024
ADV

मुंबई : Ladki Bahin Yojana | राज्यसरकारने अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. या योजनेच्या घोषणेनंतर राज्यभरातून महिलांनी योजनेसाठी अर्ज करण्यासाठी गर्दी केली. मध्यप्रदेशच्या लाडली बहन योजनेवरून राज्य सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू करण्यात आली आहे.

यानंतर आता असंघटित क्षेत्रातील मोलकरणींसाठी देखील सरकार लवकरच एक गृहोपयोगी साहित्य वाटपासंदर्भातील योजनेवर काम करत आहे. राज्यात तब्बल १० ते १२ लाख मोलकरणींची संख्या असल्याची माहिती सरकारच्या वतीने जाहीर करण्यात आली आहे.

दिवंगत आर.आर पाटील उपमुख्यमंत्री असताना १० लाख घरेलू कामगारांची संख्या असल्याची माहिती विधिमंडळात देण्यात आली होती. त्यावर तत्कालीन कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांनीही शिक्कामोर्तब केले होते. आता १२ ते १३ लाख घरेलू कामगार असून त्यात ९९ टक्के महिला आहेत. मात्र त्यामध्ये नोंदणी केलेल्या किती ? हा प्रश्न आहे.

राज्यसरकारच्या लाडकी मोलकरीण योजनेअंतर्गत स्वयंपाक घरातील कुकरसह २१ भांड्यांचा सुमारे १० हजार रुपये किमतीचा संच घरगुती कामगार महिलांना देण्याची तरतूद केली जाणार आहे. अशा संचांचं वाटप होणार असल्याची अफवा छत्रपती संभाजीनगरच्या काही भागात पसरल्यानंतर एकच गर्दी उसळल्याचे पाहायला मिळाले. (Ladki Bahin Yojana)

मात्र, संचवाटप केवळ नोंदणीधारक घरगुती मोलकरणींनाच होणार असल्याची माहिती मिळताच गर्दी ओसरली.
त्यानंतर मोलकरीण म्हणून अधिकृत नोंदणी करण्यासाठी महिलांची धावपळ सुरू झाली.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बांधकाम क्षेत्रातील कामगारांसाठीची भोजन योजना आणि
कामावरील साहित्य संचवाटपाच्या धर्तीवरच नोंदणीकृत घरेलू कामगार, मोलकरणींसाठी १० हजार रुपये किंमतीची भांडी,
कुकर आदी साहित्याचा संच देण्यात येणार आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune MPSC Student Missing | मंत्रालयात नोकरी लागल्याचं सांगून घराबाहेर पडला; पुण्यात एमपीएससी करणारा तरुण तीन महिन्यांपासून ‘गायब’

Crocodile In Varasgaon Dam | वरसगाव धरणाच्या भिंतीवर आढळली मगर; नागरिकांना सतर्कतेचं आवाहन

SP / DCP Transfer Maharashtra | पुणे पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांची छत्रपती संभाजीनगरमध्ये बदली !
विक्रांत देशमुख यांची महामार्ग सुरक्षा पथकाच्या पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती, गडचिरोली एसआरपीएफचे विवेक मासाळ पुण्यात DCP

Total
0
Shares
Related Posts