प्रेमात धोका दिल्याने जाळुन घेतल्याप्रकरणी लिपिकावर गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

एसएससी बोर्डात तिसऱ्या मजल्यावरील स्वच्छता गृहात तरूणीने जाळुन घेतल्या प्रकरणी लिपिकावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’2135a848-bd5e-11e8-8501-2738ab4efc9d’]

मगरसिंग उर्फ सुनिल सुखलाल राजपूत असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या लिपिकाचे  नाव आहे. याबाबत मुलीच्या भावाने फिर्याद दिली आहे. मगरसिंग व मयत तरुणीचे अनेक वर्षापासुन प्रेम संबंध होते. दोघे लग्न करणार होते. मात्र,दोन वर्षा पासुन मगरसिंग हा तरुणीला टाळाटाळ करत होता. तसेच लग्नालाही नकार दिला होता.

खबरी म्हणून चिडविण्यावरुन गुन्हेगाराच्या खुनाचा प्रयत्न करणाऱ्या तिघांना अटक

मगरसिंग हा एसएससी बोर्डात लिपिक म्हणून नोकरीस आहे. दरम्यान गेल्या आठवड्यात तरुणी मगरसिंग याच्या कार्यलयात गेली. यावेळी दोघांमध्ये वाद झाले. त्यानंतर तरूणीने थेट तिसऱ्या मजल्यावरील स्वच्छता गृहात गेली. तसेच अंगावर पेट्रोल टाकुन पेटवून घेतले. यात तरुणी 80 टक्के भाजली होती. उपचारादरम्यान तिचा दुसऱ्या दिवशी मृत्यू झाला होता. यानंतर तिच्या भावाने गुरुवारी शिवाजीनगर पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी मगरसिंगवर आत्महत्येस प्रवृत केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.