डॉक्टर महिलेचा हुंड्यासाठी छळ

अंबरनाथ :पोलीसनामा ऑनलाईन 

हुंडा ही अनिष्ट प्रथा कमी होण्यापेक्षा दिवसेंदिवस वाढतच आहे . चिंताजनक बाब म्हणजे उच्चशिक्षित लोंकांमध्ये हुंडयासाठी छळ करणे  यांसारख्या गोष्टींचे  प्रस्थ वाढलेले दिसत आहे . अंबरनाथ येथील एका डॉक्टर महिलेने  सासरच्या मंडळींकडून हुंड्यासाठी शारीरिक आणि मानसिक छळ होत असल्याचा कारणाने सासरच्या मंडळींविरुद्ध तक्रार दाखल केली आहे .दिलेल्या  तक्रारीवरून शिवाजीनगर पोलिस ठाण्यामध्ये सासरच्या सहा व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रुग्णालयाचे कर्ज फेडण्यासाठी माहेरवरून २० लाख रुपये आणावेत या कारणासाठी पीडित डॉक्टर महिलेला क्रूर वागणूक देण्यात येत होती.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’39738610-bd6c-11e8-ad40-97a83c512b85′]

अंबरनाथ पूर्व भागातील रॉयल पार्क नवरेनगर या भागात एका उच्चशिक्षित कुटुंबात पेशाने डॉक्टर असलेल्या सूनेलाच हुंड्यासाठी उच्चशिक्षित सासरच्या मंडळींकडून शारीरिक व मानसिक छळ करण्यात येत होता . भिवंडी महापालिकेच्या रुग्णालयामध्ये डॉक्टर असलेली ही महिला आपल्या सासरच्या मंडळींसोबत राहतात. त्यांचे पती रूपेश हे बदलापूर येथे दातांचे डॉक्टर आहेत. रुग्णालयाचे कर्ज फेडण्यासाठी माहेरवरून २० लाख रुपये आणावेत ,असा सासरच्या मंडळींनी त्यांच्याकडे तगादा लावला होता.  सासरकडील मंडळींच्या या मागणीस त्यांनी नकार दर्शवला होता .

अपहरण केलेल्या ४ पोलिसांपैकी तिघांची दहशतवाद्यांकडून हत्या
त्यामुळे त्या गोष्टीचा राग मनात धरून पिडित महिलेला घरातील पडदे लावण्याच्या रॉडने पती रूपेश यांनी मारहाण केली. या मारहाणीत त्यांच्या दोन्ही पायांच्या बोटांना जखमा झाल्या असून, त्यांच्या शरीरावरील इतर भागातही डॉक्टर पती यांच्याकडून गंभीर मारहाण करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे  पीडित महिलेची नणंद गायत्रीनेही तिचे हात बांधून तिला मारहाण केली आहे. तसेच जबरदस्तीने कपडे धुण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या साबणाचे पाणी पिण्यास प्रवृत्त करत शारीरिक आणि मानसिक छळ केला. या प्रकरणी पीडित महिलेने शिवाजीनगर पोलिस ठाण्यामध्ये पती रूपेश, सासू मुक्ता, सासरे गंगाधर, नणंद गायत्री, जाऊ आरती आणि दीर राजेश यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र याप्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आले नाही.