पुण्यातील पतंजली स्टोअरमध्ये चोरी करताना महिला अभियंता सीसीटीव्हीत कैद

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पतंजलीच्या मेगा स्टोअरमधील वस्तूंची चोरी करताना एक महिला अभियंता सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या प्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात अला असून हा प्रकार डिसेंबर २०१७ मध्ये घडला आहे. याप्रकरणी प्रमोद चंद्रकांत शहा (वय-६१) यांनी शुक्रवारी (दि.५ जुलै) स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. तर अर्चना शहा (रा. रुनवाल पार्क सोसायटी, मार्केटयार्ड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या महिला अभियंत्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी प्रमोद शहा यांचे पतंजली मेगा स्टोअर आहे. त्यांच्या दुकानातून पतंजलीच्या काही वस्तूंची चोरी होत असल्याचे त्यांना दिसून आले. त्यांनी दुकानातील सीसीटीव्ही तपासले असता एक महिला दुकानातील वस्तूंचे पॅकेट आपल्या जाकेटमध्ये लपवत असताना दिसून आली. काही दिवसांनी तिच महिला दुकानात पुन्हा खरेदीच्या बहाण्याने आली. त्यावेळी तिला दुकानातील महिला कर्मचाऱ्यांच्या मदतीने चोरी करताना रंगेहाथ पकडले. त्यावेळी तिच्याकडे चौकशी केली असता तिने तिचे नाव धनश्री पाटील असल्याचे सांगून पतीने सोडून दिल्याने ती आणि तिचा मुलगा दोघेच राहत असल्याचे सांगितले. तसेच चोरलेल्या वस्तूंचे पैसे आणून देतो असे सांगितले.

बरेच दिवस झाले तरी तिने पैसे आणून न दिल्याने शहा यांनी तिच्या मोबाईल क्रमांकावरून तिची माहिती काढली. त्यावेळी तिचे नाव धनश्री पाटील नसून तिचे खरे नाव अर्चना शहा असल्याचे समोर आले. तसेच ति हिंजवडी येथील एका नामांकीत कंपनीत इंजिनीअर म्हणून काम करत असल्याची माहिती मिळाली. तक्रारदार शहा यांनी या महिलेविरुद्ध स्वारगेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पुढील तपास स्वारगेट पोलीस करीत आहेत.

आंब्याची पानेही आरोग्यासाठी आहेत ‘फायदेशीर’

पावसाळ्यात खा भरपूर ‘जीवनसत्व’ असलेला आरोग्यदायी ‘राजमा’

स्तनाचा कॅन्सर, डायबेटीजचा धोका कमी करण्यासाठी ‘हे’ सेवन करा

रोग प्रतिकारशक्तीवर परिणामकारक ठरतात ‘या’ गोष्टी

मराठा आरक्षणाला पुन्हा एकदा न्यायालयात आव्हान !

काँग्रेस पक्ष्याचे चिन्ह पण घ्या सर

वडार समाजाचे जिल्हाधिकारी कार्यलयासमोर ‘दगड फोडो’ आंदोलन

मोदी दोन मंदिरात गेले, तर केसीआर ६ मंदिरात जातील – ओवैसी