Lady Finger For Diabetic Patients | भेंडी साखरेची पातळी कमी करू शकते? जाणून घ्या आरोग्यासाठीचे इतर फायदे

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Lady Finger For Diabetic Patients | भारतीय खाद्यपदार्थांमध्ये पौष्टिक हिरव्या भाज्यांचे अनेक प्रकार आहेत, त्यातील भेंडी (Lady Finger) हा एक सर्वोत्तम प्रकार आहे. चवीबरोबरच भेंडीत असलेले गुणधर्मही आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. भेंडीमध्ये प्रथिने, कार्बोहायड्रेट्स, फायबर (Protein, Carbohydrates, Fiber) यासारख्या पोषक द्रव्यांचा समावेश असतो, ज्याची शरीराला नियमितपणे आवश्यकता असते. इतकेच नव्हे तर नियासिन, फोलेट, फॉस्फरस, मॅग्नेशियम, लोह, मँगनीज आणि कॅल्शियम या जीवनसत्त्वांसह क, के आणि ई यांमध्येही भेंडीचा प्रादुर्भाव आढळतो, ज्यामुळे ती आरोग्यासाठी विशेष फायदेशीर ठरते (Lady Finger For Diabetic Patients).

 

भेंडीचे सेवन देखील अनेक प्रकारच्या आजारांपासून बचाव करण्यासाठी फायदेशीर ठरू शकते. विशेषत:
मधुमेहींना भेंडीचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो, कारण त्यात असलेले गुणधर्म साखरेचे प्रमाण (Sugar Level) सहज नियंत्रित करण्यास उपयुक्त मानले जातात (Health Benefits Of Eating Lady Finger).

 

ज्यांना अ‍ॅनिमियाची (Anemia) तक्रार आहे, त्यांच्यासाठी भेंडीचे सेवन करणेही विशेष लाभदायक मानले जाते. भेंडीची भाजी आपल्यासाठी कशी फायदेशीर ठरू शकते हे आपण सविस्तरपणे समजून घेऊयात?

मधुमेहात भेंडी गुणकारी आहे का (Is Lady Finger Good For Diabetes) ? :
भेंडीत फायबर, व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि अँटीऑक्सिडंट्सचं प्रमाण चांगलं असतं. रक्तातील साखर (Blood Sugar) कमी करण्यासाठी हे एक सुपरफूड आहे. यात फायबरचे प्रमाण देखील आहे जे पचन निरोगी ठेवण्याबरोबरच रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास उपयुक्त आहे (Lady Finger For Diabetic Patients).

 

याशिवाय भेंडीचा ग्लाइसेमिक इंडेक्सही (जीआय) कमी असतो, यामुळे भेंडी खाल्ल्याने शरीराला आवश्यक पोषक घटक मिळतात आणि साखर वाढत नाही. काही संशोधन असे सूचित करतात की भेंडी गर्भधारणेच्या मधुमेहाची पातळी नियंत्रित (Blood Sugar Level Control) करण्यास देखील मदत करते.

 

तणाव नियंत्रित करणारी भाजी (Stress-Controlling Vegetable) :
उंदरांवर केलेल्या संशोधनात, शास्त्रज्ञांना असे आढळले आहे की भेंडीच्या बियांच्या अर्कमध्ये अँटिऑक्सिडेंट गुणधर्म (Antioxidant Properties) असतात जे आपल्याला तणाव कमी करण्यास मदत करू शकतात. तणावाची पातळी व्यवस्थापित करणे मधुमेह नियंत्रित करण्याचा एक महत्त्वाचा भाग आहे.

 

दीर्घकाळापर्यंत, तणावाची पातळी देखील रक्तातील साखरेची पातळी वाढवू शकते. मानसिक आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी भेंडीचे सेवन फायदेशीर ठरू शकते.

 

कोलेस्ट्रॉल नियंत्रित करते भेंडी (Lady Finger Controls Cholesterol) :
हृदयरोगाचे प्रमुख कारण ठरणारे कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यास भेंडी मदत करते. प्रयोगशाळेत उंदरांवर केलेल्या अभ्यासात भेंडी मधुमेहासह कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठीही प्रभावी असल्याचे आढळून आले आहे. फायबर आणि अँटिऑक्सिडेंट गुणधर्म असलेले पदार्थ कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यात विशेष भूमिका बजावू शकतात. यामध्ये भेंडीचे सेवन केल्याने तुम्हाला मोठी मदत होऊ शकते.

भेंडी अनेक प्रकारचे पोषक तत्व (Lady Finger Contains Many Types Of Nutrients) :
कोलेस्ट्रॉल आणि मधुमेह नियंत्रित करण्यासोबतच भेंडीचे सेवन इतरही अनेक प्रकारे शरीरासाठी फायदेशीर मानले जाते.
भेंडीत असलेले व्हिटॅमिन-सी तुम्हाला रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करू शकते.

 

व्हिटॅमिन ए, बी आणि सी भरपूर असल्यामुळे गर्भवती महिलांसाठीही भेंडीचा चांगला उपयोग होतो.
यात खूप कमी कॅलरीज असतात, ज्यामुळे वजन वाढण्याचा धोका कमी होतो.
भेंडीत असलेले व्हिटॅमिन के, हाडे निरोगी ठेवण्यासाठी आणि त्याच्याशी संबंधित आजार दूर करण्यासाठी उपयुक्त आहे.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
\त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Lady Finger For Diabetic Patients | lady finger for diabetic patients health benefits of eating lady finger

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

High Cholesterol Symptoms | जेव्हा शरीरात दिसतील ‘हे’ 6 बदल तर समजून जा नसांमध्ये खराब कोलेस्ट्रॉल झाले जास्त; जाणून घ्या

 

Pimple Home Remedies | पिंपल्स दूर करण्यासाठी वापरा ‘हे’ घरगुती उपाय, वाचा सविस्तर

 

Mood Swings |’मूड स्विंग’मुळं नात्यामध्ये आणि कामावर वाईट परिणाम होतोय, तर मग करा ‘हे’ उपाय, जाणून घ्या