यंदाचा ऑस्कर जिंकून लेडी गागाने रचला ‘हा’ इतिहास

अमेरिका : वृत्तसंस्था – अमेरिकन सिंगर-अभिनेत्री लेडी गागाला करिअरमधील पहिला ऑस्कर पुरस्कार मिळाला. यंदाचा हा ऑस्कर पुरस्कार जिंकून लेडी गागाने इतिहास रचला आहे. ‘अ स्टार इज बॉर्न’ चित्रपटातील ‘शॅलो’ या गाण्यासाठी लेडी गागाला ऑस्करचा ‘बेस्ट ओरिजीनल साँग’ साठीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

ऑस्कर अवॉर्डशिवाय लेडी गागाने यंदाचे हॉलिवूडमध्ये मानाचे समजले जाणारे ग्रॅमी, बाफ्टा आणि गोल्डन ग्लोब हे पुरस्कारही तिने जिंकली आहे. त्यामुळे एकाच वर्षात हॉलिवूडमधील सर्वच मनाचे पुरस्कार पटकवणारी ती पहिली गायिका ठरली आहे.

‘अ स्टार इज बॉर्न’ या चित्रपटात लेडी गागा आणि ब्रेडली कूपर प्रमुख भूमिकेत आहे. चित्रपटातील ‘शॅलो’ हे गाणं लेडी गागानं गायलं आहे. तीच हे मंत्रमुग्ध करणारं गाणं आणि संगीत यामुळे या गाण्याची सर्वत्र चर्चा आणि कौतुकही होत आहे. तसेच ऑस्करच्या व्यासपीठावरही या गाण्याचं प्रचंड कौतुक झालं. ऑस्कर मिळाल्याची घोषणा होताच लेडी गागा अत्यंत भावूक झाली होती. ऑस्कर जिंकल्यानंतर लेडी गागाने रडत रडत भाषण केले. ‘हे माझ्या कष्टाचे फळ आहे. यासाठी मी प्रचंड मेहनत केली. तुमच्याकडे स्वप्न आहे तर ते पूर्ण करण्यासाठी दिवस-रात्र एक करा. तुम्हाला कितीदा नकार मिळतो, कितीदा तुम्ही पडता, ठेचाळता, हे महत्त्वाचे नसून तुम्ही कितीदा उठून उभे राहता, हे महत्त्वाचे आहे,’ असे लेडी गागा म्हणाली.