अल्बम रिलीज होण्या आधीच ‘सिंगर’ लेडी गागानं केलं ‘न्यूड’ फोटोशुट, ‘हे’ आहे कारण

पोलीसनामा ऑनलाईन टीम – सिंगर लेडी गागा आपल्या सिंगिंग सोबतच विचित्र स्टाईल आणि फॅशनेबल आउटफिट्ससाठी फेमस आहे. सध्या लेडी गागा आपल्या एका म्युझिक अल्बममध्ये बिजी आहे. गेल्या काही दिवसांपासून चाहते तिचा अल्बम क्रोमॅटीकची वाट पहात आहेत. हा गागाचा 6 वा स्टुडिओ अल्बम आहे. परंत हा अल्बम रिलीज होण्याआधीच गागानं एका इंटरनॅशनल मॅगेझिनसाठी न्यूड फोटोशुट केलं आहे. या फोटोशुटमुळं गागा चर्चेत आली आहे.

मॅगेझिनच्या कवर स्टोरीवरच सुरुवातीला लेडी गागा न्यूड दिसत आहे. लेडी गागानं याचं कारणही सांगितलं आहे. लेडी गागानं सांगितलं की, आम्ही आर्ट बनवण्याचा प्रयत्न करत आहोत. कोणत्याच अँगलनं ही पोर्नोग्राफी नाहीये. याशिवाय तिनं आपल्या अपकमिंग अल्बमबद्दलही सांगितलं. लेडी गागासाठी या अल्बमवर काम करणं एवढं सोपं नव्हतं. त्या काळात लेडी गागा क्रॉनिक पेन आणि डिप्रेशनमध्ये होती.

तिनं सांगितलं की, माझ्या आयुष्यातील काही दिवस मला खूप म्हणजे खूप खराब गेले होते. दिवसाची सुरुवातही अनेकदा काही खास होत नव्हती. लेडी गागाचा हा आगामी अल्बम 10 एप्रिल 2020 रोजी रिलीज होणार आहे.