‘बलात्कारानंतर’ स्वत:ला संपवण्याच्या प्रयत्नात होती हॉलिवूड अभिनेत्री ‘लेडी गागा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आणि सिंगर लेडी गागाने नुकतेच तिच्या जीवनातील अत्यंत अडचणीच्या वेळेबाबत सांगितले. लेडी गागाने आपल्या बलात्कारानंतरच्या जीवनाबाबत बोलताना सांगितले की या घटनेनंतर ती मानसिकदृष्या हेलावून गेली होती. तिने स्वत: ला हानी पोहचवण्याचा देखील प्रयत्न केला होता.

लेडी गागा नुकतेच एका मॅगजीनसाठी कवर फोटोशूट केले. या फोटोशूटनंतर तिने हॉलिवूड सेलेब्रिटी ओपरा विनफ्री को ची देखील भेट घेतली. या दरम्यान तिने एकीकडे हॉलिवूड अभिनेता ब्रॅंडली कूपर बद्दल विस्ताराने चर्चा केली तर आपल्या जीवनातील त्या घटनावर देखील बोलली जे अत्यंत कठीण होते.

गागा म्हणाली की 19 वर्षाची असताना तिचे अनेकदा लैंगिक शोषण झाले आणि आज देखील ती त्या घटनेच्या दुःखात आहे. ती म्हणाली की अ स्टार इज बोर्न या गाण्यासाठी ऑस्कर अ‍ॅवार्ड जिंकल्यानंतर तिच्या जुन्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या होत्या.

लेडी गागाने ओपरा विनफ्रीला सांगितले की मी 19 वर्षाची असताना माझ्यावर अनेकदा बलात्कार करण्यात आला. करिअर दरम्यान ही अनेक दु:ख झेलली आहेत. परंतू तरीही मी जिवंत आहे आणि कायमच पुढे जाण्याचा विचार करते. जेव्हा मी त्या ऑस्करला पाहिले तेव्हा मला ते दुख पुन्हा दिसले. मला माहित नाही जेव्हा मी माझ्या मनातील गोष्ट सांगितली तेव्हा ती तेथे उपस्थित असलेल्या कोणालाही कळाली की नाही, परंतू मी ही गोष्ट समजून आहे.

लेडी गागा भले की आता यशाच्या शिखरावर आहे परंतू त्याचा अर्थ असा नाही की तिने तिचे जीवन मागे सोडले. गागाने ओपरा म्हणाली की Post-Traumatic Stress Disorder या आठवणी अजूनही आहे. ते म्हणाले की न्यूरोपॅथिक पॅन ट्रॉमा ची प्रतिक्रिया माझ्या जीवनातील प्रत्येक आठवड्यातील भाग आहे. मी औषधे घेत आहे, माझे अनेक डॉक्टर आहेत, मी असेच जीवन जगते.

लोकांना दिला हा मेसेज –
लेडी गागाने आपल्या जीवनातील मोठा वेळ दुखात घालावला आहे. परंतू याच अनुभवाने तिचे भविष्य चांगले झाले. त्यांनी ओपरा विनफ्री यांनी सांगितले की जो कोणी अशा परिस्थितीत जगत आहे त्याला समजावणं हे आवश्यक आहे की ते ही लढाई जिंकतील आणि एक ऑस्कर जिंकू शकतात.

Visit : Policenama.com 

You might also like