‘लेडी गागा’नं Twit केला ‘संस्कृत’मधील असला ‘श्लोक’, लोक गोंधळूनच गेले

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – हॉलीवूड गायिका आणि कलाकार लेडी गागाने रविवारी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक ट्विट केले आहे. त्यामुळे सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले आहे. लेडी गागाने ट्विटरवर एक संस्कृत श्लोक ट्विट केला आहे. ‘लोकाः समस्ताः सुखिनोभवंतु’ असा श्लोक शेअर केल्यानंतर लोक याचा अर्थ आणि श्लोक पोस्ट करण्यामागचे कारण शोधत आहेत.

जर तुम्हाला या श्लोकाचा अर्थ माहित नसेल तर ‘लोकाः समस्ताः सुखिनोभवंतु’, हे एका लोकप्रिय संस्कृत श्लोकातील काही शब्द आहेत. याचा अर्थ जगात प्रेम आणि आनंद पसरवणे असा आहे. म्हणजेच जगातील सर्व ठिकाणी, सर्व लोक आनंदी आणि स्वातंत्र्यात रहावेत, आणि माझ्या जीवनाचे विचार, शब्द आणि कृती त्या आनंदात आणि त्या स्वातंत्र्यात कसा तरी हातभार लावू शकतील.

असा आहे पूर्ण श्लोक
स्वस्तिप्रजाभ्यः परिपालयंतां न्यायेन मार्गेण महीं महीशाः ।
गोब्राह्मणेभ्यः शुभमस्तु नित्यं लोकाः समस्ताः सुखिनोभवंतु ॥
ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः

लेडी गागाच्या ट्विटनंतर लोकांच्या प्रतिक्रीया
लेडी गागाने ट्विट केल्यानंतर सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. आत्तापर्यंत 50 हजार पेक्षा अधिक लोकांनी ट्विटला लाईक केले आहे. तर 11 हजार पेक्षा अधिक जणांनी त्याला प्रतिक्रीया दिली आहे. हे ट्विट पाहून बरेच लोक संभ्रमात पडले आहेत तर अनेकांनी त्यांचे स्वागत केले आणि आनंदही व्यक्त केला. लेडी गागाच्या या ट्विटला सर्व प्रकारचे लोक प्रत्युत्तर देतांना दिसत आहेत.

Visit : policenama.com

 

Loading...
You might also like