Lady Police Committed Suicide | पोलीस ठाण्यातील महिला कक्षात महिला पोलिसाची आत्महत्या

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन – Lady Police Committed Suicide | पोलीस ठाण्यातील महिला कक्षातच (Women’s Room) महिला पोलीस नाईकने गळफास (Hanging) घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. अनिता भीमराव व्हावळ Anita Bhimrao Vhaval (वय-34 रा. ठाणे) असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या महिला (Lady Police Committed Suicide) पोलीस नाईकचे नाव आहे. ही घटना मंगळवारी (दि.16) दुपारी दीडच्या सुमारास श्रीनगर पोलीस ठाण्यात (Srinagar Police Station) घडली आहे. या घटनेमुळे पोलीस वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. कौटूंबिक कारणामुळे तिने आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आल्याचे सहायक पोलीस आयुक्त जयंत बजबळे (ACP Jayant Bajbale) यांनी सांगितले.

 

महिला पोलीस नाईक (Police Naik) या पदावर कार्यरत असलेल्या अनिता या 2008 मध्ये ठाणे शहर पोलीस दलात (Thane City Police Force) भरती झाल्या होत्या. आज नेहमीप्रमाणे त्या सकाळी साडेदहाच्या सुमारास पोलीस ठाण्यात कर्तव्यावर हजर झाल्या होत्या. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास पोलीस ठाण्यातील महिला पोलीस अंमलदार त्यांना कार्यालयीन कामकाजासाठी फोनवरुन संपर्क साधत होत्या. परंतु त्यांनी फोन घेतला नाही. त्यामुळे या महिला कर्मचाऱ्याने महिला कक्षात त्यांचा शोध घेतला. तेव्हा या महिला कक्षातच अनिता वाव्हळ यांनी ओढणीने फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आढळले. त्यांच्या मागे पती आणि दोन मुली असा परिवार आहे.

श्रीनगर पोलीस ठाण्यात त्यांच्या अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी सखोल तपास करणार
असल्याचे श्रीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक लक्ष्मण तांबे (Senior Police Inspector Laxman Tambe) यांनी सांगितले.
प्राथमिक तपासात तरी कौटुंबिक कलहातून तिने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.
मात्र, हेच कारण आहे की, अन्य इतर काही अशा सगळ्या बाजूंनी तपास केला जाणार
असल्याचे ठाणे शहराचे अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. पंजाब उगले (Addl CP Dr. Punjab Ugale) यांनी सांगितले.

 

Web Title :- Lady Police Committed Suicide | lady police committed suicide by hanging herself in srinagar police station in thane

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Pimpri Crime | बारचालकाला जीवे मारण्याची धमकी देऊन खंडणीची मागणी, 4 जणांना अटक

 

Monsoon Session | उद्धव ठाकरेंची खेळी ! पावसाळी अधिवेशनात शिंदे गटाच्या आमदारांना व्हिप जारी

 

Pune Pimpri Crime | मॅट्रिमोनियल साईटवरची ओळख पडली महागात, लग्नाचे आमिष दाखवून घटस्फोटीत महिलेवर अत्याचार