Coronavirus : सकाळी पोलीस ड्युटी, सायंकाळी मास्कचे शिवणकाम, मुख्यमंत्र्यांनी केला तरुणीला सलाम !

भोपाळ :  वृत्तसंस्था –  देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असून त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. लॉकडाऊन दरम्यान नागरिकांना घराबाहेर पडता येत नाही. मात्र, काही जण अनावश्यक घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे अशांवर कारवाई करण्यासाठी पोलीस प्रशासन अहोरात्र काम करत आहे. पोलीस 12 ते 13 तास काम करून नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन करत आहे.

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने नागरीकांकडून मास्क आणि सॅनिटायझरची खरेदी केली जात आहे. त्यामुळे इतर देशांप्रमाणेच आपल्या देशात देखील मास्कचा तुटवडा आहे. त्यामुळे अनेकजण घरातच मास्क तयार करून ते लोकांना वाटत आहेत. अशा एका महिला पोलीस कर्मचाऱ्याचे सोशल मीडियावर प्रचंड कौतुक होत आहे. ही महिला पोलीस कर्मचारी लॉकडाऊनमध्ये आपले कर्तव्य बजावून घरी आल्यानंतर मास्क तयार करते.

या महिला पोलीस कर्मचाऱ्याचे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी कौतुक केले आहे. या महिला कर्मचाऱ्याचे कौतुक करताना, मुली नेहमी आनंदी रहा आणि जगाचे कल्याण करत राह असे शिवराजसिंह यांनी म्हटले आहे. या महिला पोलीस कर्मचाऱ्याची महिती संदीप सिंह नावाच्या एका व्यक्तीने ट्विटवर टाकली आहे. या महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नाव सृष्टी श्रोतिया आहे. संदीप यांनी 4 एप्रिल रोजी ट्विटरवर सृष्टी यांचा फोटो शेअर केला आहे. सृष्टी या मध्यप्रदेशातील सागरच्या खुरई पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत.

संदीप सिंह यांचे हे ट्विट मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह यांनी री-ट्विट केले आहे. ट्विट री-ट्विट करताना शिवराजसिंह यांनी,

आशा नाम मनुष्याणां कदाचिदश्चर्यशृ़डखला |
यया बद्धा: प्राधावन्ति मुक्तास्तिष्ठन्ति पड्गवत ||

मुली या सृष्टीचा आधार आहेत आणि त्यांच्यामुळे सृष्टी धन्य होते. सृष्टी सारख्या मुलींमुळे ही धन्य वारंवार धन्य झाली आहे ! मुली, नेहमी आनंदी रहा आणि जगाचे कल्याण करत रहा, असे शिवराजसिंह यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

You might also like