कौतुकास्पद ! वयाच्या 14 व्या वर्षी लग्न अन् 18 व्या वर्षी 2 मुले, अडचणींवर मात करत पुर्ण केलं IPS बनवण्याचं मोठं स्वप्न

पोलिसनामा ऑनलाईन – आयपीएस अधिकारी एन अंबिका हे एक असं व्यक्तिमत्व आहे त्यांची कहाणी तरुणांना केवळ प्रेरणाच देत नाही तर हे देखील सांगते की, त्यांचे आयुष्य़ आव्हानांनी भरलेले आहे. गुडघे टेकविण्यापेक्षा संकटांचा न डगमगता सामना करायला हवा. आता आयपीएस अंबिका यांना लोक मुंबईची ‘लेडी सिंघम’ म्हणून ओळखतात. मात्र, २००८ मध्ये हे सारे अशक्यप्राय होते.

एन अंबिका यांचे १४ वर्षांच्या असतानाच लग्न लावून देण्यात आले होते. वयाच्या १८ व्या वर्षी त्या दोन मुलांची आई बनल्या होत्या. त्यांचे पती पोलीस कॉन्स्टेबल होते. एके दिवशी त्या प्रजासत्ताक दिनाची परेड पाहण्यासाठी पतीसोबत गेल्या होत्या. जेव्हा पतीला वरिष्ठ अधिकाऱ्यांना सॅल्यूट मारताना पाहिले तेव्हा तिने पतीला असे का केले म्हणून विचारले. तेव्हा पतीने तिला ते आयपीएस अधिकारी होते. त्यासाठी सिव्हिल सर्व्हिस एक्झाम द्यावी लागते असे सांगितले. तेव्हाच अंबिका यांनी परिक्षा देण्याचे ठरविले.

परंतु, ही वाट सोपी नव्हती. कारण अंबिका यांचे शिक्षण अर्धवट राहिले होते. एका खासगी कोचिंग क्लासमधून त्यांनी १० वी आणि नंतर डिस्टंस लर्निंगद्वारे पदवी पूर्ण केली. एवढे सगळे तिने घर, संसार सांभाळून केले तेव्हा कुठे ती आयपीएस बनण्यास पात्र ठरली. डिंडीगुलमध्ये आयपीएस परिक्षेसाठी कोणतेही कोचिंग सेंटर नव्हते. अशातच अंबिकाने चेन्नईमध्ये राहून सिव्हिल सर्व्हिस परिक्षेची तयारी करण्याचे ठरविले. पतीनेही तिला साथ दिली. जेव्हा अंबिका चेन्नईला राहत होत्या तेव्हा त्यांचे पती नोकरी करत मुलांनाही सांभाळत होते.

दरम्यान, अंबिका आयपीएसची परिक्षा एकदा नाही तर तीन वेळा नापास झाल्या. मात्र, त्या हरल्या नाहीत. तिच्या पतीला वाटत होते की आता तिने माघारी यावे. मात्र, अंबिका यांनी शेवटचा चान्स घेण्याचे ठरवले आणि २००८ मध्ये त्या पासही झाल्या. आयपीएस अधिकाऱ्याचे ट्रेनिंग पूर्ण केल्यावर त्यांना पहिली पोस्टिंग महाराष्ट्रात मिळाली. आज अंबिका या मुंबईच्या झोन-४ च्या डीसीपी आहेत.