Lagir Jhala Ji | दुर्देवी ! ‘लागिरं झालं जी’ सिरियलमधील अभिनेत्याचं अपघाती निधन

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Lagir Jhala Ji | झी मराठी वाहिनीवरील ‘लागिरं झालं जी’ (Lagir Jhala Ji) या सिरियलमधील अभिनेता डॉ. ज्ञानेश माने (Dr. Dnyanesh Mane) यांचं दुर्देवी निधन (Died) झालं आहे. 14 जानेवारी रोजी त्यांचं अपघाती निधन झालं. डॉ ज्ञानेश माने हे रोटी घाटातून (Roti Ghat) प्रवास करतेवेळी त्यांच्या गाडीचा अपघात (Accident) झाल होता. त्या अपघातात त्यांचा दुर्देवी मृत्यु झाला आहे.

 

याबाबात माहिती अशी, डॉ ज्ञानेश माने हे रोटी घाटातून प्रवास करत असताना त्यांच्या गाडीचा अपघात (Accident) झाला. अपघातानंतर ते बेशुद्धावस्थेत होते. त्यानंतर त्यांना पुण्याच्या (Pune News) ससून रुग्णालयात उपचारासाठी आणले. परंतु, 14 जानेवारी रोजी सकाळीच त्यांनी दवाखान्यात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे बारामतीतील (Baramati) उत्कृष्ट कलाकार गमावल्याची हळहळ व्यक्त होते आहे. (Lagir Jhala Ji)

 

अभिनेता डॉ. ज्ञानेश मानेंचा परिचय –
डॉ. ज्ञानेश माने (मुळ गाव झारगडवाडी, बारामती) पेशाने डॉक्टर होते.
त्यांच्या मागे पत्नी, 2 भाऊ, भावजया आणि पुतणे असा परिवार आहे.
लागिरं झालं जी या मालिकेत अभिनेते माने एका महत्त्वाच्या भूमिकेत होते.
या दरम्यान, निरपराध, भक्तांचा पाठीराखा, सोलापूर गॅंगवार,
काळूबाईच्या नावानं चांगभलं, आंबूज, हंबरडा, यदया, पळशीची पी टी अशा
अनेक चित्रपट आणि मालिकेमधून त्यांनी महत्वाच्या भूमिका बजावल्या होत्या.

 

Web Title :- Lagir Jhala Ji | accidental death lagir jhala ji fame actor dr dnyanesh mane

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pimpri Corona Updates | पिंपरी चिंचवडमध्ये शहरामध्ये ‘कोरोना’च्या रुग्णसंख्येचा तीन लाखांचा टप्पा पार, गेल्या 24 तासात 2365 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Pune Corporation | मध्यवर्ती शहरातील प्रमुख रस्त्यांवरील ‘खाचखळग्यांचा’ त्रासाची डेडलाईन 10 फेब्रुवारीपर्यंत; 20 जानेवारीची डेडलाईन हुकली

 

Corporator Vasant More | खासदार निधीतून बसविलेली 15 टॉयलेटस् बंद अवस्थेत; उभारण्यासाठी केलेला 2 कोटींचा खर्च संबधित लोकप्रतिनिधींकडून वसुल करावा – मनसेची मागणी

 

Pune Corona Updates | पुण्यात गेल्या 24 तासात 3959 नवीन रुग्णांचे निदान, मृतांचा आकडा वाढला; जाणून घ्या इतर आकडेवारी