पोलिसांची पुन्हा पोलखोल, रेप केसमध्ये शिक्षा भोगत असलेल्या नारायण साईकडे सापडला मोबाइल

सूरत : वृत्तसंस्था – सूरत रेप केसमध्ये कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या नारायण साईकडे मोबाइल फोन सापडला आहे. नारायण साईं हा अल्पवयीन मुलीवर बलात्कारातील आरोपी आणि कथित आध्यात्मिक गुरू आसाराम बापूचा मुलगा आहे आणि सध्या लाजपोर सेंट्रल कारागृहात बंद आहे. जेल प्रशासनाने नारायण साईंकडे मोबाईल सापडल्याप्रकरणी स्थानिक सचिन पोलीस ठाण्यात प्रकरण दाखल केले आहे.

जेलच्या अ/2 बरॅक नंबर- 55 मध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला नारायण उर्फ नारायण साईं आसुमल हरपलानी शिवाय याच बरॅकच्या अन्य चार कैद्यांकडून सुद्धा मोबाइल फोन जप्त केला आहे. सूरतच्या जेलमधून मोबाईल मिळण्याची ही पहिली घटना नाही. यापूर्वी सुद्धा येथून मोबाइल जप्त करण्यात आले आहेत.

नारायण साईं हा कथा आणि प्रवचनाच्या आडून महिलांना आपल्या वासनेची शिकार बनवत होता. नारायण साईंविरूद्ध सूरतच्या ज्या दोन पीडित मुलींनी साक्ष दिली होती त्यांचेही कथा आणि प्रवचनाच्या आडून नारायण साईने शोषण केले होते.

दोन्ही बहिणींनी नारायण साईवर आरोप केला होता की, त्याने कथेच्या बहाण्याने अनेकदा त्यांच्यावर बलात्कार आणि अनैसर्गिक सेक्स सुद्धा केला. इतकेच नव्हे, तर त्यांना हे देखील सांगण्याचा प्रयत्न केला की, तो त्यांच्यावर खुप प्रेम करतो, यासाठी तो त्यांना लव्ह लेटरसुद्धा लिहित होता.

सूरतच्या या दोन्ही पीडित बहिणी आसारामच्या आश्रमात साधक म्हणून राहात होत्या. त्यांनी सांगितले की, आसाराम आणि त्याचा मुलगा नारायण साईकडे त्यांच्या पत्नीच त्यांना घेऊन जात होत्या. यानंतर नारायण साईं त्यांच्यावर बलात्कार करत असे. रेप पीडित मुलींनी सांगितले होते की, नारायण साईने त्यांच्यावर अनेक ठिकाणी वाईट कृत्य आणि शारीरीक शोषण केले.

नारायण साईं नेहमीच असे अनेक मुलींसोबत करत होता. त्याने अनेक मुलींशी शारीरीक संबंध ठेवले होते. जेव्हा मुलींनी त्याच्याविरूद्ध बलात्काराची तक्रार केली, तेव्हा नारायण साईं म्हणत होता तो त्यांच्यावर प्रेम करत होता.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like