Coronavirus : उत्तर प्रदेशात देवालाच घातलं ‘मास्क’, म्हणाले – ‘हात धुवून या अन् पुन्हा स्पर्श करा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  – चीनमधून पसरलेल्या कोरोना व्हायरसने जगभरात कहर केला आहे. भारतालाही या व्हायरसने ग्रासले असून आतपर्यंत ८३ प्रकरणाची पुष्टी झाली आहे. यामुळे प्रत्येक स्तरावर खबरदारी घेतली जात आहे. यांचं पार्श्वभूमीवर शनिवारी लखीमपूर खिरीच्या प्रसिद्ध संकटा देवी मंदिरात देवाला संसर्ग नये म्हणून भाविकांनी त्यांनाही मास्क घातले आहेत. यासोबतच हात न धुता मूर्तींना हात लावू नका असे आवाहनही करण्यात आले आहे. मंदिराचे पुजारी आकाश यांनी सांगितले कि, माता संकटा देवी मंदिरात लोकांची प्रचंड गर्दी असते. यामुळे, आम्ही कोरोना विषाणूचे संरक्षण करण्यासाठी प्रतिकात्मकपणे देवाच्या मूर्तीला मास्क घातला. तसेच अश्या प्रकारची पोस्टर लावून लोकांना कोरोना विषाणूची जाणीव करून देत आहोत की लोकांनी प्रथम हात धुवावे आणि बाकीची काम करावी. ते म्हणाले की स्वच्छता ठेवल्याने कोरोना विषाणूपासून बचाव होऊ शकतो.

जनजागृतीचा संदेशही :
संकटा देवी मंदिराचे पुजारी आकाश म्हणाले की, जगभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. हा विषाणू स्पर्शाने पसरतो. लोकांना जागरूक करण्यासाठी, देवालाही मास्क घातला आहे. जेणेकरून लोक या विषाणू संदर्भात जागरूक असतील. ते इतरांशी हात मिळवणी करणार नाहीत आणि अफवा पसरणार नाहीत.

दरम्यान, भारतात कोरोना व्हायरसची ८३ प्रकरणे समोर असली असून त्यात उत्तर प्रदेशात कोरोना विषाणूची एकूण ११ सकारात्मक प्रकरणे समोर आली आहे. त्यापैकी १० भारतीय आणि १ विदेशी नागरिक आहे. तर भारतात आतपर्यंत २ जणांच्या मृत्यूची नोंद आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like