Lakhimpur Kheri Video | लखीमपूर खेरी घटनेचा आणखी एक व्हिडीओ समोर; मंत्र्याच्या भरधाव SUV नं शेतकऱ्यांना चिरडलं

उत्तर प्रदेश : पोलीसनामा ऑनलाइन –  Lakhimpur Kheri Video | लखीमपूर खेरी येथे भाजप नेते आणि शेतकरी यांच्यात झालेल्या हिंसाचारामुळे अजूनही येथील वातावरण तणावाचे आहे. या घटनेशी संबंधित अनेक व्हिडीओ (Lakhimpur Kheri Video) आतापर्यंत समोर आले आहेत. त्यातच आता यासंदर्भात आणखी एक व्हिडीओ बुधवारी रात्री समोर आला आहे. या व्हिडिओत काळ्या रंगाची एसयुव्ही वेगानं येताना दिसतेय. त्यानंतर ती कार शेतकऱ्यांना चिरडून पुढे जात असल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

दरम्यान, भाजप खासदार वरून गांधी यांनी ही लखीमपुर खेरीमध्ये झालेल्या हत्तेच्या संदर्भातील व्हिडिओ आपल्या ट्विटर हँडवर पोस्ट केला आहे.
हा व्हिडिओ अधिक धक्कादायक आहे. या व्हिडिओत दिसत असल्याप्रमाणे मागून भरधाव वेगाने जाणारी कार पटकन शेतकर्‍यांवर चढते आणि पुढे जाते.
त्याच्या मागे आणखी दोन गाड्या जाताना दिसतात. घटनेनंतर लगेचच लोक इकडे -तिकडे धावताना दिसत आहेत.

लखीमपूर खेरी घटनेची सर्वोच्च न्यायालयाने स्वतःहून दखल घेतली आहे.
या प्रकरणावर आज सीजेआयच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय खंडपीठाद्वारे सुनावणी होणार आहे.
ज्यात CJI NV रमणा तसेच न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती हिमा कोहली यांचा समावेश आहे.

या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यासाठीही मंगळवारी सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठावण्यात आला.
दाखल केलेल्या याचिकेत लखीमपूर खेर घटनेसंदर्भात एफआयआर नोंदवण्यासाठी गृह मंत्रालय आणि पोलिसांना निर्देश द्यावेत तसेच मंत्र्यांना शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी करण्यात आली आहे.

रविवारी लखीमपूर खेरीचे दोन वेळा खासदार राहिलेले आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांच्या मूळ बनबीरपुर गावात उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य येणार होते.
याचाच शेतकरी विरोध करत होते. दरम्यान, यावेळी झालेल्या दंग्यात आठ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये चार शेतकऱ्यांचा समावेश होता.
मिश्रा यांचा मुलगा ज्या एसयूव्हीमध्ये बसला होता, त्याने चार शेतकऱ्यांना चिरडले असा आरोप शेतकऱयांनी केला आहे.
या घटनेनंतर तेथील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. विरोधकांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. (Lakhimpur Kheri Video)

 

काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी बुधवारी सीतापूर मधून लखीमपूर खेरीसाठी रवाना झाले.
लखनऊ विमानतळावर राहुल गांधी पोहोचताच त्यांना आपल्या वाहनाने जाण्याची परवानगी देण्यात आली नाही.
यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले. राहुल गांधी यांनी तेथेच धरणे आंदोलनाला बसले. प्रशासनाला त्यांच्या गाडीतून राहुल यांना घेऊन जाण्यास असून बसले.
त्यावरून राहुल आणि अधिकाऱ्यांमध्ये वाद झाला. मात्र काही वेळानंतर प्रकरण शांत झालं आणि राहुल गांधी सीतापुरसाठी रवाना झाले.

 

Web Title : Lakhimpur Kheri Video | lakhimpur kheri new horrible video suv car running on farmers

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Navratri Utsav | मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी केली मुंबादेवीच्या चरणी प्रार्थना, म्हणाले – ‘कोरोनाचे सावट कायमसाठी जाऊ दे’ (व्हिडीओ)

Kolhapur Crime | दुर्देवी ! नरबळीची चर्चा पण 48 तासात ‘पर्दाफाश’; 6 वर्षाच्या बालकाशी जन्मदात्यानं केलं भयंकर ‘कृत्य’; जाणून घ्या प्रकरण

Accident News | उत्तर प्रदेशच्या बाराबंकी येथे बस-ट्रकची समोरासमोर धडक; 8 जणांचा जागीच मृत्यू