9 अधिकाऱ्यांच्या घरांवर छापा; तपास अधिकाऱ्यांना सापडलं मोठं ‘घबाड’

बंगळूर : वृत्तसंस्था – कर्नाटक येथील लाचलुचपत प्रतिबंध विभागाने (Anti-Corruption Bureau) चक्क ९ अधिकाऱ्यांच्या घरांवर धाड टाकल्याने त्यामध्ये तपास अधिकाऱ्यांना मोठं घबाड सापडलं आहे. यामध्ये दागदागिने, सोन्याची भांडीकुंडी आणि महागडी घड्याळे ताब्यात घेण्यात आली आहे. तर सापडलेल्या या ९ अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात आली आहे.

कर्नाटक भ्रष्टाचार विरोधी पथकाने दिलेल्या माहितीनुसार या धाडी दरम्यान, म्हैसूरमधील सुपरिटेंडेंट इंजिनियर के.एम. मुनी गोपाल राजू यांच्या घरात छापेमारी करण्यात आली आहे. तर त्यांच्या घरामधून दाग-दागिने, महागडी घड्याळे आणि सोन्याचे दागिने सापडले आहेत. तसेच काही दिवसांआधी बॉलीवूड डायरेक्टर अनुराग कश्यप, अभिनेत्री तापसी पन्नू आणि मधू मनटेना यांच्यासह अनेक सिने कलाकारांच्या घरांवर प्राप्तिकर विभागाने छापा टाकला होता. ही छापेमारी फँटम चित्रपटाच्या करचोरी बाबत करण्यात आली होती.

दरम्यान, कर्नाटक लाचलुचपत प्रतिबंध विभागाने कर्नाटक राज्यातील अनेक भागांत छापा टाकण्यात आला. यामध्ये जवळपास ५२ अधिकारी आणि १७२ कर्मचाऱ्यांच्या एका पथकाने ११ जिल्ह्यांतील २८ ठिकाणांवरून नऊ अधिकाऱ्यांविरोधात बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी अशा धाडी टाकण्यात आल्या आहेत.