मध्य प्रदेशातून येतेय लाखोंनी रोख रक्कम

रामटेकमध्ये दोन कारमधून ८० लाखांची रोकड पकडली

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – लोकसभा निवडणुका जाहीर झाल्याबरोबर पैशांचा वापर सुरु झाला आहे. निवडणुक आचारसंहिता लागू झाल्यानंतर पोलिसांनी सुरु केलेल्या वाहन तपासणीत सावनेर तालुक्यातील सातनूर केळवद या ठिकाणी दोन कारमध्ये ८० लाख रुपयांची रोकड पोलिसांनी पकडली आहे.

रामटेक लोकसभा मतदार संघातील अंतर्गत सावनेर तालुक्यातील सातनूर केळवद या ठिकाणी दोन वाहनाच्या तपासणीत जिल्हा प्रशासन आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली.

एका कारमधून ३० लाख तर दुसऱ्या कारमधून ५० लाख अशी रोकड पकडली आहे. संबंधित वाहनचालक ही रोकड कुठे नेत होते याचे उत्तर देता आले नाही. त्यांनी काहीही माहिती दिली नाही.

त्यामुळे जिल्हा प्रशासनाने रोकड जप्त करत ती पुढील तपासासाठी आयकर विभागाला सोपविली आहे. ज्या ठिकाणी ही कारवाई झाली ते मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात येणारे मार्ग आहेत.

मध्यप्रदेशातून राज्यात येणाऱ्या आणखी एका मार्गावर ७ लाख ६० हजारांची रोकड पकडली होती. त्यामुळे मध्य प्रदेशातून नागपूरात कोण पैसे घेऊन येते. हा पैसा राजकीय कारणासाठी आणला जातो की आणखी काही कारण त्यामध्ये आहे,  असे अनेक प्रश्न अनुउत्तरीत आहेत.