वैद्यकीय व्यावसायिकास 8 लाखांची खंडणी मागितली

अहमदनगर: पोलीसनामा ऑनलाईन

हॉस्पिटल व मेडिकल चालविणार्‍यास 8 लाख रुपयांची खंडणी मागण्याचा आली. 25 जुलै रोजी सायंकाळी बालिकाश्रम रस्त्यावरील एका मेडिकल दुकानात ही घटना घडली.

याप्रकरणी रमेश दिलीप नाईक (रा. वाळकी, ता. जि. नगर) व इतर 6 ते 7 अनोळखी व्यक्तींविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाईक हा त्याच्या साथीदारांसमवेत 25 जुलै रोजी सायंकाळी पाच वाजता मनमोहन बहुरुपी (रा. भूतकरवाडी, नगर) यांच्या मेडिकल दुकानासमोर आला. ‘तुमच्या हॉस्पिटल व मेडिकल उत्पन्न जास्त असल्यामुळे मला 8 लाख रुपये खंडणी स्वरुपात द्या’, अशी मागणी केली. पैसे दिले नाही, तर हॉस्पिटल चालू देणार नाही व तुम्हाला जिवे मारून टाकू, अशी धमकी दिली. बहुरुपी यांनी अहमदनगर पोलिसांकडे फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी नाईक याचेविरुद्ध गुन्हा दखल केला आहे. पुढील तपास अहमदनगर पोलीस करीत आहेत.