बनावट दागिने तारण ठेवून लाखोंचं कर्ज घेणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन

कोल्हापूर जिल्ह्यात बनावट सोन्याचे दागिने तारण ठेऊन नामांकित बँका आणि सराफ व्यावसायिकांना लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या टोळीतील ९ जणांना करवीर पोलिसांनी अटक केली आहे. या टोळीकडून दोन किलो 9 तोळे सोन्याचे बनावट दागिने जप्त केले असून प्राथमिक तपासात 39 लाख 32 हजारांची फसवणूक केल्याचं निष्पन्न झालं आहे.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’f03cf62e-cd43-11e8-8930-038c3ea856fe’]

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की ,कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बँका पतसंस्था आणि सराफ व्यावसायिक यांच्याकडे बनावट सोने तारण ठेवून फसवणूक करणारी टोळी कार्यरत असल्याची माहिती करवीर पोलिसांना मिळाली होती या माहितीच्या आधारे गुन्हे शोध पथकाने कोल्हापूर जिल्ह्यातील विविध ठिकाणी चौकशी सुरू केली.

या चौकशीच्या आधारे कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक, आय सी आय सी बँक , वीरशैव बँक, दर्शन सहकारी पतसंस्था, भाग्यलक्ष्मी ज्वेलर्स, शंकर गणपतराव शेळके ज्वेलर्स, महालक्ष्मी ज्वेलर्स यांच्याकडे असणाऱ्या सोन्याची तपासणी सुरू केली यावेळी त्यांना दोन किलो नऊ तोडे बनावट सोने आढळले या बनावट होण्याच्या आधारे फसवणूक करणाऱ्या 39 लाख 32 हजार रुपयांचे कर्ज घेतल असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी पोलिसांनी टोळी प्रमुख चंद्रकांत शिवराम भिंगार्डे यांच्यासह नऊ जणांना अटक केली आहे. या टोळी मध्ये दोन महिलांचा समावेश असून एक महिला सातारा जिल्ह्यातील कोरेगाव ची रहिवासी आहे. त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याच पोलिसांनी सांगितलं.
[amazon_link asins=’B07CRCPM4T’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’f5b542c1-cd43-11e8-a666-f55852aeb018′]

या टोळीने दोन किलो नऊ तोळे बनावट सोन्याच्या 31 चेन, 3 अंगठ्या आणि दोन कानातले पोलिसांनी जप्त केली आहेत सोन्याच्या वेगवेगळ्या दागिन्यांना आतून अन्य धातूचा वापर करून त्यावर जाडसर असा सोन्याचा मुलामा देऊन बनावट दागिन्यांचा उपयोग करून ते सोनं तारण ठेवल्याचं तपासात समोर आला आहे. या प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याने आणखी काही साथीदार असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

ही कारवाई पोलीस अधिक्षक अभिनव देशमुख, अपर पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक सुरज गुरव, पोलिस निरीक्षक सुनील पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक एस एस काळे, सहाय्यक फौजदार रमेश ठाणेकर, प्रशांत माने, राजेंद्र जरळी, धर्मेंद्र बगाडे, सुहास पाटील, किरण वावरे, प्रथमेश पाटील, सागर कांडगावे, दीपक घोरपडे, युक्ती ठोंबरे, सुमित पाटील, सुनील माळी, रोहित कदम, उदय शेळके, महादेव बुगडे, दगडू खाडे, रमेश खनाई, सुनील कुंभार, विठ्ठल पाटील , श्रुती कांबळे यांनी केली आहे.
[amazon_link asins=’B0796QP4LS’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’fbbc8923-cd43-11e8-837d-9b1d20caa89e’]

या प्रकरणातील आरोपींची नावे खालील प्रमाणे-

टोळी प्रमुख- चंद्रकांत शिवराम भिंगार्डे वय- 55 (राहणार फुलेवाडी कोल्हापूर) साथीदार, अतुल निवृत्ती माने ( वय-29, राहणार- गणेशवाडी, तालुका-करवीर, जिल्हा कोल्हापूर), विलास अर्जुन यादव (वय 45, राहणार- गणेशवाडी, तालुका-करवीर, जिल्हा कोल्हापूर),अमर दिनकर पाटील (वय- 28 राहणार- गणेशवाडी, तालुका-करवीर, जिल्हा कोल्हापूर), भारती श्रीकांत जाधव (पाचगाव तालुका-करवीर, जिल्हा-कोल्हापूर),कविता आनंदराव राक्षे (वय- 38 राहणार -सुभाष नगर, कोरेगाव जिल्हा- सातारा), विक्रम मधुकर कोईगडे (वय-30 राहणार- शिरोली दुमाला तालुका- करवीर, जिल्हा – कोल्हापूर), राकेश रजनीकांत रणदिवे (वय- 41 राहणार- गंगावेश, जिल्हा-कोल्हापूर ),पृथ्वीराज प्रकाश गवळी (वय- 28 राहणार- शिंगनापूर तालुका-करवीर, जिल्हा-कोल्हापूर)
[amazon_link asins=’B07B1B5CVK’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’0c0b5724-cd44-11e8-a374-59c78f72645a’]

पाहिजे असणारा आरोपी

10. तानाजी केरबा माने (वय-46, राहणार -गणेश वाडी, तालुका-करवीर, जिल्हा-कोल्हापूर)

फसवणुक झालेल्यांची नावे-

1. जिल्हा मध्यवर्ती बँक कोल्हापूर शाखा शिरोली दुमाला आणि कसबा बीड फसवणूक पाच लाख 44 हजार पाचशे रुपये

2. आय सी आय सी आय बँक शाखा कोतोली बाजार भोगाव घोटवडे फसवणूक 14 लाख 43 हजार 462 रुपये

3. वीरशैव बँक शाखा सानेगुरुजी वसाहत आणि राशिवडे फसवणूक चार लाख सात हजार रुपये

4. राजे विक्रमसिंह घाटगे बँक शाखा बाचणी फसवणूक सहा लाख रुपये

5. दर्शन सहकारी पतसंस्था महाराणा प्रताप चौक कोल्हापूर फसवणूक सात लाख 67 हजार रुपये

6.भाग्य लक्ष्मी ज्वेलर्स पाचगाव फसवणूक एक लाख 40 हजार रुपये

7.शंकर गणपतराव शेळके ज्वेलर्स माळ्याची शिरोली फसवणूक बारा हजार रुपये

8. महालक्ष्मी ज्वेलर्स बालिंगा फसवणूक अठरा हजार रुपये