शासनाच्या डोळ्यात धूळ फेकून खड्डे भरण्याच्या नावाने लाखो रुपयांचा केला चुराडा

मुरबाड : पोलीसनामा ऑनलाइन –   रस्त्यांच्या दुरुस्तीच्या नावे ठेकेदारांनी शासनाची फसवणूक चालवली असून, मुरबाड तालुक्यातील अनेक रस्त्यांची दैयनीय अवस्था झाली असून, जीवघेणा प्रवास झाला आहे. मात्र, याच रस्त्यांमध्ये पडलेले खड्डे, उखडलेला रस्ता यांना जबाबदार हे निकृष्ट दरजाचे काम करणारे ठेकेदार असून, यांच्यावर ठोस कारवाही करून खड्डे भरण्याच्या नावाने चाललेली लाखो रुपयांची लयलूट थांबवून दर्जेदार रस्ते व्हावेत.

सार्वजनिक बांधकाम विभाग ठाणेअंतर्गत न्याहाडी मेर्दी रस्त्यावर खड्डे भरण्याच्या नावाखाली लाखो रुपयांचा चुराड केला जात असल्याचे उघडकीस आले आहे. मागील वर्षी मे महिन्यात या रस्त्यावरील खड्डे भरले गेले होते. तालुक्यात खेड्यापाड्यातील रस्त्यांवर खड्ड्यांची चाळण झालेली असून, रस्त्यात खड्डे की खड्ड्यांत रस्ता तर काही ठिकाणी रस्ता चोरीला गेला की काय, अशी नागरिकांमध्ये चर्चे आहे. ठाणे सार्वजनिक बांधकाम विभागाने ठराविक ठेकेदारांना पोसण्यासाठी हे खड्डे भरण्याचे काम मागील वर्षी दिले होते. मात्र, मलमपट्टीव्यतिरिक्त उपाययोजना न केल्याने न्याहाडी मेर्दी रस्त्यावरील खड्डे पूर्ववत निर्माण झाल्याने या खड्डे बुजवाबुजवीऐवजी कायम उपाययोजना करण्याची मागणी भाजपचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष विलासकाका देशमुख यांनी केली आहे.

You might also like