शिक्षकाकडून पाच वर्षात दाम दुप्पटच्या नावाखाली लाखो रूपयांची फसवणूक

सुधाकर बोराटे / इंदापूर : पोलीसनामा ऑनलाईन

इंदापूर येथिल भिमाई आश्रम शाळेतील शिक्षक तानाजी चंदनशिवे यांनी आपण पर्ल्स कंपनिचा एजंट आसुन आपन हप्त्याने माझ्याकड रोख रक्कम गुंतवणूक केल्यास पाच वर्षात जमा होणार्‍या रक्कमेच्या दाम दुप्पट रक्कम मिळवुन देण्याचे आमिष दाखवून  भिमाई आश्रम शाळेतील शिक्षक कर्मचार्‍यांची वर्ग व इंदापूर तालुक्यातील आनेक नागरीकांना गंडा घातला आसुन लाखो रूपयांची फसवणूक केल्याची माहीती भिमाई आश्रम शाळेचे संस्थापक अध्यक्ष रत्नाकर मखरे यांनी पत्रकार परिषदेत प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

सदर फसवणूक प्रकरणाबाबत शाळेतील शिक्षक व इतर नागरीक यांनी संस्थेचे अध्यक्ष रत्नाकर मखरे यांचेकडे तानाजी चंदनशिवे याचे विरोधात पुराव्यादाखल शंभर रूपयांच्या स्टँप पेपरवर दहाजनांनी नोटरी जबाब करून तक्रारी सादर केलेल्या आहेत. या तक्रारींची गंभिर दखल घेवुन सदर शिक्षक तानाजी चंदनशिवे यांना सक्तीच्या रजेवर पाठविल्याची माहीती संस्थेचे अध्यक्ष रत्नाकर मखरे यांनी दिली. तर तानाजी चंदनशिवे व त्याची पत्नी या दोघांनीही फसवणूक केली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

[amazon_link asins=’B01EU2M62S,B01MTX7IXG’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’4da3117c-b973-11e8-984e-efc6591a240c’]

शिक्षक चंदनशिवे व त्याची पत्निने दोघांनी मिळुन मी रत्नाकर मखरे यांचे शाळेत शिक्षक आसुन पर्ल्स कंपनीमध्ये मासीक हप्त्याने पैसे भरल्यास पाच वर्षात जमा होणार्‍या रक्कमेच्या दुप्पट रक्कम तुम्हाला आम्ही मिळवुन देवु असे खोटे आश्वासन देवुन आमच्याकडुन दर महिन्याला घरी येवुन रोख रक्कम घेवुन गेलेले आहेत. परंतु पाच वर्षे उलटून गेल्यानंतर जमा रक्कम मुद्दल व दामदुप्पट रक्कम चंदनशिवे यांचेकडे मागणी केली असता उडवा उडवीची उत्तरे देवुन आम्हाला सतत टाळण्याचा प्रयत्न करत आहेत.तर  पाच वर्षाच्या मुदतीला सात वर्षे उलटुन गेली तरी आम्हाला भरलेल्या रकमेपैकी मुद्दलही मिळाले नाही व ठरलेली दामदुप्पट रक्कमही मिळाली नाही. त्यामुळे सदर शिक्षकाने आमच्याशी खोटे बोलुन, खोटी आश्वासने देवुन आमची  मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक केल्याचे आमच्या लक्षात आले आहे.त्यामुळे आम्हाला आमचे भरलेले पैसे परत मिळण्यासाठी आम्ही  भिमाई आश्रम संस्था अध्यक्ष रत्नाकर मखरे यांचेकडे लेखी तक्रार अर्ज केले असल्याचे नोटरी तक्रारीत नमुद करण्यात आले आहे. एकुण दहा तक्रारदारांनी रत्नाकर मखरे यांचेकडे तक्रार अर्ज नोटरी करून न्याय मिळण्यासाठी सादर केले आहेत.

भरदिवसा धारधार हत्याराने महिलेची निर्घृण खून

भिमाई आश्रम संस्थेचे शिक्षक तानाजी चंदनशिवे यांच्या विरोधात फसवणूक केल्याचे तक्रार अर्ज रत्नाकर मखरे यांचेकडे दाखल झाल्यानंतर त्यांनी तानाजी चंदनशिवे यांना या गोर गरीबांचे घेतलेले पैसे परत देवुन प्रकरण मिटवुन टाकण्याची विनंती केली परंतु त्यानी पैसे परत देण्यास असमर्थता दाखविली.घडलेला प्रकार हा गंभिर स्वरूपाचा आसुन तो संस्थेशी निगडीत शिक्षकाने केला असल्याने घडलेल्या प्रकारातुन संस्थेची बदनामी होउ नये व या प्रकरणाला पूढे गंभिर वळण लागू नये याची दक्षता घेवुन नाईलाजाने सदर शिक्षकाला सक्तीच्या रजेवर पाठविण्याची  कारवाई करणे भाग पडत आहे.तर संस्था एवढ्यावरच थांबनार नसुन  सदर शिक्षक पती पत्नी विरोधात फसवणूक प्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करणार असल्याची माहीती प्रसिद्धी पत्रकादवारे रत्नाकर मखरे यांनी पत्रकार परिषदेत इंदापूर येथे दीली.