मोहरम , मिलाद-उन-नवी , शाब-ए-मेराज , शाब-ए-बरात , ईद-उल-फित्र (रमजान ईद) अशा अनेक उत्सवांसोबतच मुस्लिम समाजाचा ईद-उल-अधा (बकरी ईद) हा एक सण आहे. या दिवशी कुराणमधील बळीची घटना साजरी केली जाते. इस्लामच्या तीन मुख्य ईदपैकी हा एक दिवस आहे. हा सण जगभर साजरा केला जातो. या सणाच्या दरम्यान बकरे घेण्यासाठी मार्कट मध्ये लाखो रुपयांची उलाढाल होत असते. हे बकरे शिरोई, राजस्थान, भोपाल, कोटा, सौजल, झांसी, पंजाब, कश्मीर आदी ठिकाणाहुन हे बकरे आणण्यात येतात. यांची किंमत १० हजारांपासून ते १ ते दीड लाख रुपयांच्या गगनात भिडतो.
[amazon_link asins=’B01ETSOX6U’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’4be8c64d-a4f1-11e8-b2ca-2754bb855aa3′]
अशा एका तंदुरुस्त बकऱ्यापासुन कमीत कमी ३० ते ४० किलो मटण मिळत असते. पुण्यातील कोंडवा, मंडई, कौसरबाग येथे मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या जातीचे बकरे विकण्यात आले आहेत. मात्र दरवर्षीपेक्षा या वर्षी बकऱ्यांची किंमत दिवसेंदिवस महाग होत असल्याचे अनेक खरीददारांनी सांगितले.