‘लक्ष्मी बॉम्ब’, ‘गुलाबो सिताबो’सह ‘हे’ सिनेमे ऑनलाईन रिलीज होण्याची शक्यता ! जाणून घ्या कोणते प्लॅटफॉर्म्स शर्यतीत आहेत

पोलिसनामा ऑनलाइन –कोरोना व्हायरसमुळं जगातील अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे. फिल्म इंडस्ट्रीलाही याचा मोठा झटका बसला आहे. जवळपास दोन महिने होत आलेत सिनेमा हॉल बंद आहेत. यानंतर आता काही बड्या सिनेमांच्या मेकर्सनं त्यांचे सिनेमे OTT वर म्हणजेच ऑनलाईन स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे.

1) गुलाबो सिताबो- एका इंग्रजी वृत्तानसुार या सिनेमाचे राईट्स अॅमेझॉन प्राईमनं खरेदी केले आहेत. डायरेक्टर शुजित सरकारानं याआधीच याबाबत संकेत दिले होते. बिग बी अमिताभ आणि आयुष्मान खुराना या सिनेमात प्रमुख भूमिकेत आहेत.

2) लक्ष्मी बॉम्ब- अक्षय कुमारचा हा सिनेमा ईदला रिलीज केला जाणार होता. आता हा सिनेमा ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर रिलीज केला जाणार आहे अशी चर्चा आहे. एका रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की, मेकर्स आणि डिज्नी प्लस हॉटस्टार यांच्यात बातचित पक्की झाली आहे.

3) झुंड- बिग बींचा हा एक मोठा सिनेमा आहे जे 8 मे रोजी रिलीज होणार होता. परंतु लॉकडाऊनमुळं ते शक्य झालं नाही. एका रिपोर्टमध्ये उल्लेख केल्याप्रमाणे प्रोड्युसिंग कंपनी टी सीरिज आणि अॅमेझॉन प्राईम व्हिडीओ यांच्यात बातचित सुरू आहे. लवकरच सिनेमा ऑनलाईन रिलीज केला जाईल.

4) लुडो- अभिषेक बच्चन आणि राजकुमार राव काम करत असलेला हा सिनेमाही अॅमेझॉल प्राईमच्या खात्यात गेला आहे.

या सिनेमांना घेऊन बातचित सुरू आहे

काही सिनेमे असे आहेत ज्यांना घेऊन अद्यापही बातचित सुरू आहे. करण जोहरचा गुंजन सक्सेना, विद्या बालन स्टारर शकुंतलादेवी-हनुमान कंप्युटर, भूमि पेडणेकर स्टारर दुर्गावती, बिग बींचा चेहरे या सिनेमांचा त्यात समावेश आहे.