लक्ष्मी मित्तल आणि त्यांच्या कुटुंबीयांनी COVID -19 च्या लसीसाठी दिली 3300 कोटींची देणगी

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : ग्लोबल स्टील टायकून म्हणून ओळखले जाणारे लक्ष्मी निवास मित्तल आणि त्यांच्या कुटुंबीयांनी कोरोना विषाणू लस तयार करण्यासाठी 35 लाख पौंड (सुमारे 3300 कोटी रुपये) चे अनुदान दिले आहे. मित्तल परिवाराने ही रक्कम ऑक्सफोर्ड विद्यापीठातील लसीकरण विभागाला दिली आहे. हा विभाग जेनर इन्स्टिट्यूट अंतर्गत येतो आणि त्याचे संचालक प्रोफेसर अ‍ॅड्रियन हिल आहेत. आता या विभागाचे नाव बदलून ‘लक्ष्मी मित्तल अँड फॅमिली प्रोफेसरशिप ऑफ व्हॅक्सिनोलॉजी’ असे केले जाईल. ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या विकास कार्यालयाने आपल्या एका अहवालात याबाबत माहिती दिली आहे.

जगातील सर्वोत्कृष्ट व्हॅक्सिन इन्स्टिट्यूट

लसींच्या अभ्यासासाठी जेनर संस्था जगातील सर्वोत्कृष्ट संस्था मानली जाते. संस्था कोविड -19 ची लस बनवण्यामध्ये व्यस्त आहे. हे आता जगातील सर्वात मोठे शैक्षणिक लस केंद्र बनले आहे. सध्या या संस्थेने विकसित केलेल्या एका लसीची मानवी चाचणी युनायटेड किंग्डम, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिकेत सुरू आहे.

लक्ष्मी मित्तल काय म्हणाले ?

या अहवालात आर्सेलर मित्तलचे मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मी मित्तल यांच्या हवाल्याने लिहिले गेले आहे की, ‘हे वर्ष संपूर्ण जगासाठी एक वेकअप कॉल आहे जेणेकरुन आपण भविष्यासाठी स्वतःला तयार करू शकू. आपल्या सर्वांनाच कळून चुकले आहे की कसा एक साथीचा आजार सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या नुकसान करू शकतो.’ ते पुढे म्हणाले की मला नेहमीच आरोग्य सेवेत विशेष रस होता.

प्रत्येकाप्रमाणे मी देखील कोविड -19 या लसीसंदर्भात होत असलेल्या कामांकडे लक्ष ठेऊन होतो. तसेच मित्तल म्हणाले, ‘प्रोफेसर हिल यांच्याशी झालेल्या रंजक वार्तालापानंतर मी आणि माझे कुटुंबीय या निर्णयावर पोहोचलो की हिल आणि त्यांची टीम परिश्रम व मेहनत घेत आहेत. ते केवळ सध्याच्या संकटासाठी काम करत नाहीत तर भविष्यातील संभाव्य आव्हानांवरही काम करत आहेत.’

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like