#Viral : लालकृष्ण अडवाणी यांचे मत काॅंग्रेसला ?

मुंबई : वृत्तसंस्था – देशात सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीचा तिसरा टप्पा नुकताच पार पडला असून चौथ्या टप्प्यातील मतदान सोमवारी (दि.२९) होत आहे. तिसऱ्या टप्प्यात गुजरातमधील २६ जागांसाठी विक्रमी मतदान झाले. यामध्ये गांधीनगर लोकसभा मतदार संघाचेही मतदान झाले. गांधीनगर येथे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवणी यांनी मतदान केले. अडवाणी यांच्याबाबतची एक पोस्ट सध्या व्हयरल होत आहे. या पोस्टमधून भाजपने तिकिट नाकारल्याने अडवाणी नाराज झाल्याने त्यांनी काँग्रेसला मत दिल्याचा दावा करण्यात आला आहे.

लालकृष्ण अडवाणी यांनी शाहपूर हिंदी स्कूलमध्ये आपल्या मतदानाचा हक्क बजावला. मतदान केल्यानंतर सोशल मीडियावर आडवाणी याचा फोटो आणि मेसेज व्हायरल करण्यात आला. या मसेजमध्ये लिहिण्यात आले आहे कि ‘सत्तरीनंतर पहिल्यांदाच आयुष्यामध्ये मी काँग्रेसला मतदान केले आहे. यासाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचे आभार मानतो. राहुल गांधी हे याचे खरे मालक आहेत.’ अशी पोस्ट व्हायरल करण्यात आली. तसेच या पोस्टमध्ये अडवाणी यांनी मतदान केल्यानंतरचा फोटो ही शेअर करण्यात आला आहे.

लालकृष्ण अडवाणी यांचे वय झाले असल्याचे सांगत भाजपने त्यांचे तिकिट कापले. अडवाणी लढत असलेल्या गांधीनगर लोकसभा मतदार संघात भाजपने भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना तिकिट दिले. यामुळे अडवाणी नाराज झाले होते. भाजपने अडवाणी यांना काही पर्याय दिले होते. मात्र अडवाणी यांनी निवडणूक लढवण्याच्या निर्णयावर ठाम होते. अडवाणी यांना निवडणूक लढवण्याची इच्छा असतानाही त्यांना उमेदवारी देण्यात आली नाही. त्यामुळे अडवाणी यांनी काँग्रेसला मत दिले, असा दावा व्हायरल पोस्टमधून करण्यात येत आहे. तसेच अडवाणी यांनी सोशल मीडियावर अशी पोस्ट लिहिली असल्याचे ही सांगण्यात येत आहे.