‘लालबागच्या राजा’च्या महाउत्सवाला मंगळवारपासून सुरुवात, हजारो कार्यकर्त्यांची फौज, 3 कोटी भाविक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड आणि अर्थकारणासाठी प्रसिद्ध असलेल्या मुंबईची दुसरी ओळख म्हणजे गणेशोत्सव. गणेशोत्सवामध्ये विशेष चर्चा असते ती म्हणजे लालबागच्या राजाची. लालबागच्या राजाच्या या महाउत्सवाला मंगळवारपासून सुरुवात होत आहे. लालबागच्या राजाची एक झलक पाहण्यासाठी भाविक तासन् तास रांगेत असतात. यावेळी कार्यकर्त्यांची प्रचंड फौजही असते.

या वर्षी राजाच्या भोवती चांद्रयान 2 चा देखावा साकारला आहे. लालबागच्या राजाच्या उत्सवाचं हे 86वं वर्ष आहे. या वर्षीचा उत्सव स्मरणात रहावा यासाठी कार्यकर्तेही जीवाचं रान करत आहेत. राजाचं हे भव्य व्यवस्थापन पाहून थक्क व्हायला होतं.

10 दिवसांत 2 कोटी भाविक

लालबागच्या राजाचं काम दिसतं तसं 10 दिवसांचंच परंतु हे काम तब्बल वर्षभरच सुरुच असतं. गणेशोत्सवाचे 10 दिवस म्हणजे वर्षभराच्या कामाचा कळसाध्याय असतो. कार्यकर्तेही तहान-भूक विसरून राजाच्या सेवेत हजर असतात. गेल्या वर्षी 10 दिवसांमध्ये अंदाजे दीड कोटी भाविकांनी राजाचं दर्शन घेतलं. दरवर्षी भाविकांची ही गर्दी वाढतच जाताना दिसते. यावर्षी भाविकांची गर्दी 3 कोटींपर्यंत जाण्याची शक्यता आहे. मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे यांनी याबाबत भाष्य केलं आहे.

मंडळाचे अध्यक्ष म्हणतात…

मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे म्हणतात की, “भाविकांना त्रास होऊ नये तसेच त्यांना शांततेत दर्शन घेता यावं यासाठी व्यवस्थापण करणं हे एक आव्हान असतं. परंतु हे आव्हान आम्ही संधी म्हणून स्विकारतो. दरवर्षी उत्तम नियोजनाचा आमचा प्रयत्न असतो. मंडळाकडे तब्बल 5 हजार कार्यकर्त्यांची फळी आहे. हे कार्यकर्ते लाखो भाविकांसाठी किमान चहा-नाश्ता, लहान मुलं, स्त्रिया, ज्येष्ठ मंडळी, अतिमहत्त्वाची माणसे अशा सगळ्यांचं व्यवस्थापन करतात.”

आरोग्यविषयक वृत्त –