Lalbaugcha Raja  | गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट! भक्तांनी लालबागच्या राजाचे दर्शन आणि पूजा ऑनलाइन करण्याचे आवाहन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Lalbaugcha Raja |महाराष्ट्रातील गणेशोत्सव (Maharashtra Ganpati Mhotsav) संपूर्ण देशातच नव्हे तर जगात प्रसिद्ध आहे. परंतु यावर्षी गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट दिसून येत आहे. याच कारणामुळे मुंबई मंडळाचे सचिव सुधीर साळवी यांनी म्हटले की यावर्षी सुद्धा लालबागचा राजा (Lalbaugcha Raja) गणेशोत्सव मंडळ कोरोना मार्गदर्शक तत्वांनुसार गणेशोत्सव साजरा करणार आहे.

गणपती बाप्पाची 4 फुटांची मूर्तीची 10 सप्टेंबरला स्थापना केली जाईल. गणेशोत्सव मंडळ भक्तांना घरातच राहून बाप्पाचे ऑनलाईन दर्शन आणि पूजा करण्याचे आवाहन मंडळ करणार आहे.

कोरोना महामारीमुळे (Corona Pandemic) मुंबई आणि कोकणात गणेशमूर्ती बनवणार्‍या कारागिरांना मोठा फटका बसला आहे. कोरोना आणि महागाईमुळे एकुणच गणेशोत्सावर सावट दिसून येत आहे. मुंबईतील मूर्तीकार प्रशांत कौशिक यांनी म्हटले मागील वर्षीपेक्षा यावर्षी गणेशमूर्तींची मागणी बरी आहे.

लालबागच्या राजाचे दर्शन ऑनलाइन (Online Darshan of Lalbaugcha Raja)
देश आणि जगभरातून लोक दरवर्षी लालबागच्या राजाच्या दर्शनाला येतात. सामान्य जनतेपासून सेलिब्रिटीपर्यंत सर्व लालबागच्या राजाच्या दरबारात हजेरी लावतात. 10 दिवस येथे प्रचंड जल्लोषाचे वातावरण असते.

मात्र, कोरोनाच्या तिसर्‍या लाटेमुळे मंडळ व्यवस्थापन स्वता भक्तांना घरी राहून बाप्पाचे ऑनलाइन दर्शन आणि पूजा करण्याची विनंती करत आहेत.
महामारीपासून सुरक्षित राहून सण साजरा करावा,
असे आवाहन मंडळाने केले आहे.

Web Title :  lalbaugcha raja ganeshotsav mandal observe ganesh chaturthi
while adhering to covid 19 guidelines

Paytm सारख्या वॉलेटमधून सुद्धा खरेदी करू शकता ‘इश्यू’,
SEBI ने दिली परवानगी

Maharashtra Police | हातात रिव्हॉलवर घेऊन व्हिडीओ बनवणं
पोलीस कर्मचाऱ्याला पडलं महागात; तडकाफडकी निलंबन (व्हिडीओ)

Pune Bhusar Market | पुण्याच्या भुसार बाजारात आता 5 ठिकाणी ‘पे अँड पार्क’