मुंबईतील गणेश मंडळांचा पूरग्रस्तांसाठी मोठा निधी, ‘लालबागच्या राजा’कडून 25 लाखांची मदत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोल्हापूर, सांगलीसाठी समस्त देशातून मदतीचा ओघ मोठ्या प्रमाणावर येत आहे. अन्नधान्यासोबत कपडेही पूरग्रस्तांसाठी पाठवले जात आहेत. देशातील अनेक सामाजिक संस्था पूरग्रस्तांना पुन्हा उभे राहण्यासाठी मदत करत आहेत. मुंबईतील गणेश मंडळांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. ‘लालबागचा राजा’ मंडळानं पूरग्रस्तांसाठी २५ लाखांची, तर ‘चिंचपोकळीचा चिंतामणी’ मंडळानं ५ लाखांची मदत दिली आहे.

‘लालबागचा राजा’चे मंडळ रायगडमधील जुई गावच्या धर्तीवर एक संपूर्ण गाव दत्तक घेऊन त्याचे पुनर्वसन करणार आहे. मुंबईतील गणेश मंडळांनी सजावटीवरील अनावश्यक खर्च टाळून पूरग्रस्तांना मदत द्यावी, असं आवाहन सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीनं काही दिवसांपूर्वीच केलं होतं.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटद्वारे पोस्ट करत या बाबतची माहिती दिली आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी ब्रह्मनाळ हे गाव दत्तक घेतले आहे. याच गावात बोट उलटी होऊन १७ जणांचा मृत्यू झाला होता. येथील ७०० कुटुंबांचे पुनर्वसन करण्याची जबाबदारी प्रकाश आबेडकर यांनी घेतली आहे.

आरोग्यविषयक वृत्त