Lalit Prabhakar | अभिनेता ललित प्रभाकरचा आगामी चित्रपट ‘टर्री’चा पोस्ट आउट; लिलतच्या रांगड्या लुकने वेधले प्रेक्षकांचे लक्ष

पोलीसनामा ऑनलाइन : मराठी अभिनेता ललित प्रभाकरचा (Lalit Prabhakar) आगामी चित्रपट ‘टर्री’ चे पहिले पोस्टर रिलीज करण्यात आले. पोस्टरमध्ये ललितचा रांगडा लूक प्रेक्षकांना खूपच भावला आहे. या चित्रपटात खरी मैत्री जोपासणारा, प्रत्येक जबाबदारी स्वीकारणारा आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाणाऱ्या ‘टर्री’ ची कथा या चित्रपटातून आपल्याला दिसणार आहे. यात ललित प्रभाकर (Lalit Prabhakar) एक नव्या अंदाजातच पाहायला मिळणार आहे.

हा चित्रपट 17 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. ऑन युव्हर स्पॉट आणि फॅन्टासमागोरिया फिल्म्स यांच्या सहयोगाने ‘टर्री’ चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. तर या चित्रपटात ललित प्रभाकर (Lalit Prabhakar) सोबत गौरी नलावडे, शशांक शेंडे, अनिल नगरकर आदी कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटाची निर्मिती अक्षय आढळराव यांनी केले. सहनिर्माते महेश सहानी आणि सुबूर खान आहेत. तर या चित्रपटाचे लेखन दिग्दर्शन राष्ट्रीय पारितोषिक विजेते महेश रावसाहेब काळे यांनी केले आहे.

अमेय गोळे यांनी या चित्रपटाचे छायांकन केले आहे. तर संकलन प्रवीण जहागीरदार, श्रीराम बडवे यांचे आहे.
प्रफुल कार्लेकर, स्वप्निल गोडबोले यांचे संगीत या चित्रपटाला लाभले आहे. तर अवधूत गुप्ते, रोहित राऊत,
शरयू दाते यांच्या आवाजात या चित्रपटातील गाणी संगीतबद्ध करण्यात आली आहेत.
तर या चित्रपटाचे ॲक्शन डिरेक्टर एजाज गुलाब हे आहेत.
आतापर्यंत साकारलेल्या भूमिकांपैकी एक वेगळीच भूमिका ललित (Lalit Prabhakar) या चित्रपटातून
साकारणार आहे. यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली असून त्याचा अंदाज प्रेक्षकांना नक्कीच आवडेल असा
विश्वास ललित ने व्यक्त केला आहे.

Web Title :- Lalit Prabhakar | actor lalit prabhakar is seen in the upcoming marathi film turry

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Jalna ACB Trap | 80 हजाराची लाच घेताना उप कार्यकारी अभियंता अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

Pune Cyber Crime | मेसेजला प्रतिसाद देणे पडले महागात; प्राध्यापकाला सायबर चोरट्याने घातला 5 लाखांना गंडा

Pune Crime | न्यायालयाने दखल घेतल्यानंतर लोणी काळभोर पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल; प्रेमप्रकरणाच्या संशयावरुन तरुणाचा खून