काय सांगता ! होय, लालूप्रसादांना 2 नव्हे तर 3 ‘पूत्र’ ? बिहारच्या मंत्र्यानं दाखविली कागदपत्रे

पटना : पोलीसनामा ऑनलाइन – चारा घोटाळा प्रकरणी रांचीच्या होटवार कारागृहात शिक्षा भोगत असलेले, राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव आता नव्या वादात सापडले आहेत. बिहारच्या राजकीय वातावरणात तिसऱ्या लालूपुत्राचा प्रवेश झाला आहे. लालूंना दोन मुले आणि एक मुलगी असल्याचं लोकांना माहिती होतं. परंतु, नितीश कुमार यांच्या सरकारमधील मंत्री नीरज कुमार यांनी तिसऱ्या लालूपुत्राला नागरिकांसमोर आणलं आहे.

नीरज कुमार यांनी केलेल्या दाव्यानुसार या तिसऱ्या मुलाचे नाव तरुण यादव आहे. लालू प्रसाद यादव यांची दोन मुले तेजप्रताप आणि तेजस्वी यादव सर्वांना ज्ञात आहेत. परंतु, लालू यांनी तरुण यादव या मुलाच्या नावाने जमीन खरेदी केल्या असून, कागदपत्रानुसार तो त्यांचा तिसरा मुलगा होतो. तसेच लालू यांच्या दोन्ही मुलांचे नाव ‘त’ वरुन सुरु होते आणि या तिसऱ्या मुलाचे नाव देखील ‘त’ वरुन सुरु होत आहे. तसेच हा तरुण यादव कोण आहे. याबाबतचा खुलासा लालू यांनी करावा, असं आव्हान देखील नीरज कुमार यांनी दिलं आहे.

नीरज कुमार पुढं म्हटले, तरुण यादव हा लालूंचा दत्तक पुत्र आहे का? यावर त्यांनी स्पष्टीकरण द्यावं. लालू प्रसाद यादव हे ठक असून, त्यांनी आपल्या कुटुंबातील लोकांना नोकरी देण्याचे आमिष दाखविले आणि त्याच्याबदल्यात जमीन लाटल्याचा आरोप केला गेला. तसेच त्याबाबतीचे दस्तावेजही जारी केले आहेत. यातील काही कागदपत्रांवर तरुण यादवचे नाव असून, लालूंनी आता तिसऱ्या मुलाला हक्क द्यावा, असा टोलाही त्यांनी लगावला.

दरम्यान, या प्रकरणावरती बोलताना लालूंची मुलगी मिस भरती यांनी हे घाणरेडे राजकारण सुरु असल्याचं म्हटलं आहे. तेजस्वीचे लहानपणाचे नाव तरुण होते. त्याचे हे टोपण नाव आहे. २००२ साली तेजस्वी यादव यांनी एका कार्यक्रमात बोलताना मी सातवीतील विद्यार्थी असून, माझे नाव तरुण यादव असल्याचं म्हणलं होतं.