लालू यादव यांची ‘अक्कल’ दाढ ‘उखडली’, ‘चारा’ घोटाळ्याची भोगतायत ‘शिक्षा’

रांची : वृत्तसंस्था – चारा घोटाळ्यात तुरुंगात शिक्षा भोगत असलेले आणि रांचीमध्ये रिम्सच्या (RIMS) पेइंग वार्डमध्ये उपचार घेत असलेले लालू प्रसाद यादव सोमवारी रात्री दाताच्या त्रासाने झोपू शकले नाहीत. त्यांना मंगळवारी रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्यांची अक्कल दाढ काढण्यात आली.

डॉक्टर म्हणाले की लालू प्रसाद यादव यांना कडक सुरक्षा व्यवस्थेत रिम्सच्या पेइंग वार्डमधून बाहेर काढून डेंटल विभागात नेण्यात आले. डेंटल विभागाच्या डॉ. बी. के. प्रजापती यांच्या देखरेखीत लालू प्रसाद यादव यांची अक्कल दाढ काढण्यात आली. डॉक्टरांनी सध्या लालू प्रसाद यादव यांना हलके जेवण घेण्यास सांगितले आहे. डॉक्टरांनी त्यांनी थंड खाण्यापासून दूर राहण्यास सांगितले आहे. तसेच दोन दिवसांपासून त्यांच्या चेहऱ्यावर सूज होती.

लालू प्रसाद यादव सध्या किडनीसह 15 गंभीर आजारांनी ग्रस्त आहेत. लालू यादव यांना 3 ऑक्टोबर 2013 साली चारा घोटाळ्यात दोषी ठरवण्यात आले. ते डिसेंबर 2017 पासून तुरुंगात आहेत. रिम्समध्ये त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.