मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – काही दिवसांपूर्वी आलेलं पंजाबी गाणं लॅम्बोर्गिनी खूपच हिट झालं होतं. युट्युबवर या गाण्यानं कोटींच्या घरात व्ह्युज मिळवले. लग्न असो वा पार्टी हे गाणं ऐकायला मिळणारच एवढं हे फेमस झालं होतं. या गाण्यात दिसलेल्या मॉडेलचीही खूप चर्चा होताना दिसली. या मॉडलेचं नाव आहे हर्षदा विजय. हर्षदा लॅम्बोर्गिनि या गाण्याआधी अनेक टीव्ही कमर्शियल्समध्ये दिसली आहे.

अ‍ॅक्टींग आणि मॉडेलिंग करणारी करणारी हर्षदा सोशल मीडियावर कायम अ‍ॅक्टीव असते. सोशलवर चाहत्यांसोबत फोटो शेअर करायला हर्षदाला खूप आवडतं. हर्षदानं अनेक बोल्ड आणि सेक्सी फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.

हर्षदा एक फिटनेस फ्रीक आहे. त्यामुळे आपल्या वर्कआऊटचे फोटो आणि व्हिडीओ ती अनेकदा चाहत्यांसोबत शेअर करताना दिसत असते. चाहत्यांनाही तिचा बोल्ड अवतार खूप आवडतो. चाहतेही कमेंट करत आपल्या भावना व्यक्त करत असतात. सध्या तिचे काही बोल्ड अँड सेक्सी फोटो सोशलवर राडा घालताना दिसत आहेत.

लॅम्बोर्गिनी गाण्याआधी तिनं ब्रिटानिया, हिमालया, व्हॅस्मॉल, मान्यवर मोहे अशा अनेक जाहिरातीत काम केलं आहे. अनेक म्युझिक अल्बममध्येही ती झळकली आहे. खूप कमी काळात तिनं आपली ओळख तयार केली आहे.

https://www.instagram.com/p/Bz9_N_jAIAY/

हर्षदाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर आपल्या स्कुल लाईफननंतर लगेचच तिनं मॉडेलिंगला सुरुवात केली होती. अभिनेता श्रेयस तळपदेसोबत विठ्ठल या मराठी सिनेमातही तिनं काम केलं आहे. याच सिनेमातून तिनं करिअरला सुरुवात केली होती. या सिनेमातून ती घराघरात पोहोचली. लॅम्बोर्गिनी हे तिचं गाणं प्रचंड गाजलं.

https://www.instagram.com/p/ByI0gEXAuQy/