सर्जिकल स्ट्राइकचे हिरो संदीप सिंग यांना वीरमरण

श्रीनगर: वृत्तसंस्था

दोन वर्षांपूर्वी पाकिस्तानच्या ताब्यातील काश्मिरमध्ये घुसून दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचे हिरो लान्स नायक संदीप सिंह हे सोमवारी (दि.२४) एका चकमकीदरम्यान  शहीद झाले. मात्र, शहीद होण्यापूर्वी सिंह यांनी त्यांच्या सहकाऱ्यांना वाचवत तीन दहशतवाद्यांना ठार करत साहसी वृत्ती दाखविली.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’3cad5da0-c0b8-11e8-8a1d-cb4e850e3644′]

सोमवारी संदीप सिंग ४ पॅरा कमांडोच्या टीमसोबत तंगधार सेक्टरच्या गगाधारी नार परिसरात सर्च ऑपरेशन करत होते. त्यावेळी त्यांना संशयास्पद हालाचाली दिसून आल्या. त्यानंतर त्यांनी या अतिरेक्यांचा पाठलाग सुरू केला. यावेळी सिंग यांच्या टीमची अतिरेक्यांसोबत चकमक उडाली. अतिरेक्यांनी अचानक हा हल्ला केल्याने सिंग यांनी मोर्चा सांभाळत त्यांना जशास तसे प्रत्युत्तर दिले. यावेळी त्यांनी तीन अतिरेक्यांचा खात्मा करत आपल्या सहकाऱ्यांचे प्राण वाचवले.

मालदीवला चीनपासून मिळणार मुक्ती ?

ही धुमश्चक्री सुरू असताना ते जखमी झाले होते. मात्र तरीही त्यांनी अतिरेक्यांविरोधात कारवाई सुरूच ठेवली. मात्र त्यांनाही एक गोळी लागल्याने त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांनी प्राण सोडले. संदीप सिंग हे पंजाबच्या गुरुदासपूरचे रहिवासी आहेत. त्यांना पत्नी आणि एक ५ वर्षाचा मुलगा आहे. २००७ मध्ये संदीप सिंग लष्करात भरती झाले होते.
संदीप सिंग यांनी २०१६ मध्ये झालेल्या सर्जिकल स्ट्राइकमध्ये सहभागी झाले होते. पाकिस्तानच्या सीमेत शिरून भारतीय सैन्याने अनेक दहशतवादी चौक्या नेस्तनाबूत केल्या होत्या. तसेच अनेक दहशतवाद्यांचाही खात्मा केला होता. या मोहिमेत प्राणांची बाजी लावून संदीप सिंगही उतरले होते. याच संदीप सिंग यांना सोमवारी दहशतवाद्यांशी दोन हात करताना वीरमरण आले.

[amazon_link asins=’B078BNQ313′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’4dec573d-c0b8-11e8-8716-2b49ff471673′]