खंडाळा जमीन प्रकरण : लकडवालाशी कनेक्शन असलेल्या भूमी अभिलेख अधिकाऱ्याला बेड्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – खंडाळ्यातील ५० कोटी रुपयांची बेवारस जमीन बळकाण्याच्या प्रकरणात सरकारी अधिकाऱ्याचाही सहभाग असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने भूमी अभिलेख विभागातील एका अधिकाऱ्यासह दोघांना अटक केली आहे. बांधकाम व्यावसायिक लकडवालाने या जमीनीसाठी तब्बल साडेअकरा लाख रुपये सरकारी अधिकाऱ्याला व दलालाला देण्यासाठी खर्च केले.

भूमी अभिलेखमधील अधिकारी विकास ढेकळे आणि दलाल दीपक गुप्ता या दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. यापुर्वी आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने युसुफ लकडवाला आणि शौकल घौरी यांना अटक केली आहे.

युसुफ लकडवाला याने ही जमीन बळकावण्यासाठी ११ कोटी ५० लाख रुपये खर्च केल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्याने बनावट डीडी आणि करारपत्र तयार करून जमीन कशी बळकावता येईल. बनावट कागदपत्रे कशी तयार करता येतील, अशा पळवाटा भूमी अभिलेखचा अधिकारी ढेकळे याने सांगितल्या होत्या. त्यानंतर यासाठी लकडवालाने गुप्ताला १ कोटी, घोरीला दीड कोटी, तर मोहन नायर याला ४ कोटी रुपये देण्यात आले होते. त्यात सर्वात मोठा वाटा ५ कोटी रुपये ढेकळे याला दिल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. दरम्यान नायर तेव्हापासून पसार आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like