भुमीअभिलेख कार्य़ालयातील अधिकाऱ्याला कोऱ्या कागदाच्या रीमची लाच घेताना अटक

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन

लाच स्वरुपात लाखो रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात येते. मात्र, नाशिक जिल्ह्यातील येवला भुमिअभिलेख कार्य़ालयातील उप अधिक्षकाने कोऱ्या कागदाच्या रीमची लाच मागितली. ही लाच स्विकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने उप अधिक्षकाला रंगेहाथ पकडले. ही कारवाई आज (२१ सप्टेंबर) दुपारी चारच्या सुमारास तहसिल कार्यालयाच्या प्रशासकीय ईमारतीमधील उप अधिक्षक कार्य़ालयाच्या कर्मचारी कक्षात करण्यात आली. या प्रकारामुळे भुमिअभिलेख कार्य़ालयात एकच खळबळ उडाली आहे मात्र उप अधिक्षकांनी अशा प्रकारची लाच मागितल्यामुळे आश्चर्य़ व्यक्त करण्यात येत आहे.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’e86ff559-bdbd-11e8-b7d8-2520dc933bf0′]

मुरलीधर शंकर ठाकरे (वय-५१ रा. म्हसरुळ लिंक रोड, नाशिक) असे अटक लाच घेताना पकडण्यात आलेल्या लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी ट्रेडींग व्यवसाय करणाऱ्या ३६ वर्षीय इसमाने नाशिक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली आहे.

तक्रारदार यांना सिटी सर्व्हेचा नवीन मालमत्ता उतारा पाहिजे होता. उतारा देण्यासाठी मुरलीधर ठाकरे याने शसासकीय फी व्यतिरीक्त १८० रुपये किंवा १ कोऱ्या कागदाची रिमची लाचेची मागणी केली. ठाकरे याने तक्रारदाराकडून २२० रुपये किंमतीची कोऱ्या कागदाची रीम लाच म्हणून स्विकारताना रंगेहाथ पकडण्यात आले.

ही कारवाई नाशिक लाच लुचपत प्रतिबंध विभागाचे पोलीस निरीक्षक डी.टी. धोंडे यांच्या पथकाने सापळा रचून केली.
[amazon_link asins=’B07CRCPM4T’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’eddc0cf3-bdbd-11e8-a06a-dfe4cc3a32e0′]

सरकारी काम करण्यासाठी कोणताही लोकसेवक, लोकप्रतिनिधी लाचेची मागणी करत असल्यास त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करावी असे आहवाहन लाच लुचपत प्रतिबंध विभागाने केले आहे.

हिंदुस्थानी चित्रपटातील कमल हसन सारखे काम करणारे RTO कार्यालयातील ३७ अधिकारी निलंबित