लांडे खून प्रकरण, माजी महापौर कोतकरसह दोघांना जामीन मंजूर

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – लांडे खून प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेले आरोपी माजी महापौर संदीप कोतकर व त्याचे बंधू सचिन कोतकर या दोघांना आज मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. यापूर्वी भानुदास कोतकर व अमोल कोतकर या दोघांना जामीन मंजूर झाला आहे.

माजी महापौर संदीप कोतकर यांना केडगाव दुहेरी हत्याकांडात यापूर्वीच जामीन मंजूर झालेला आहे. आता लांडे खून प्रकरणातही जामीन मंजूर झाल्याने ते लवकरच बाहेर येतील. अशोक लांडे खून प्रकरणात काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष भानुदास कोतकर याला यापूर्वीच जामीन मंजूर झालेला आहे. तसेच अमोल कोतकर यालाही जामीन मंजूर झाला होता. दोघांना जिल्हा बंदीची अट घालून दिल्याने ते जिल्ह्याबाहेर वास्तव्यास आहेत. संदीप कोतकर व सचिन कोतकर हे दोघेच कारागृहात होते.

दोघांच्या जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेण्यात आली होती. त्यांच्यावतीने वकील अभय ओस्तवाल यांनी काम पाहिले. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने काही अटी व शर्तींवर संदीप कोतकर व सचिन कोतकर या दोघांना जामीन मंजूर केला आहे.

फेसबुक पेज लाईक करा https://www.facebook.com/policenama/