फैजलनंतर आता आमिर सिद्दिकीचं TikTok अकाउंट ‘सस्पेंड’
Share
पोलिसनामा ऑनलाईन – महिलांवरील अॅसिड हल्ल्याची खिल्ली उडवणारा व्हिडिओ फैजल सिद्दिकीने टिक-टॉकवरशेअर केला होता. त्यामुळे सोशल मीडियाचे अनेक नियम मोडल्यामुळे त्याचे टिक-टॉक अकाऊंट सस्पेंड करण्यात आले. आता त्यापाठोपाठ आमिर सिद्दिकीचे देखील टिक-टॉक अकाऊंट सस्पेंड करण्यात आले आहे.
कास्टिंग दिग्दर्शकाला धमकावणारे मेसेज पाठविल्यामुळे आमिर विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. तसेच त्या दिग्दर्शकाच्या वकिलाने, ‘माझ्या क्लायंटने केलेल्या तक्रारीनंतर आमिर सिद्दिकीचे टिक-टॉक अकाऊंट सस्पेंड करण्यात आले आहे’ असे म्हटले आहे. आमिर विरोधात दिग्दर्शकाने टिक-टॉककडेही तक्रार केली आहे. मात्र आमिरने हे सर्व आरोप फेटाळले असले तरी त्याचे टिक-टॉक अकाऊंट सस्पेंड करण्यात आले आहे. आमिरचे टिक-टॉकवर 3.8 मिलियन फॉलोअर्स होते. त्याचे टिक-टॉक व्हिडीओ चाहत्यांना विशेष आवडत होते. तसेच त्याचे इन्स्टाग्रामवर देखील पाच लाखांपेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत. आमिरने युट्यूब विरोधात केलेल्या एका व्हिडीओमुळे चर्चेत होता.