लंगरपेठच्या डॉक्टरला लुटल्याप्रकरणी मिरजेतील तरूणास अटक

मिरज : पोलीसनामा ऑनलाईन

कवठेमहांकाळ तालुक्यातील लंगरपेठ येथील डॉ. सुदर्शन घेरडे यांना फसवून त्यांच्याकडून 1 लाख 80 हजार रूपये लुटल्याप्रकरणी संशयित प्रकाश विठ्ठल शिंदे (वय 33, रा. अलंकार कॉलनी, मिरज एमआयीडीसी, रोड) याला अटक करण्यात आली. सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांनी ही माहिती दिली.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’02c27dd8-cef5-11e8-8d59-c990fb17f363′]

हा प्रकार दि. 10 ऑक्टोबर रोजी घडला. डॉ. घेरडे यांना एका तरूणीने फोन करून ‘दाताची सफाई करायची आहे’, असे सांगितले. मात्र ‘मी दाताचा डॉक्टर नसून फिजीशियन आहे’ असे डॉक्टरांनी त्या तरूणीला सांगितले. तरीही त्या तरूणीने पुन्हा डॉक्टरांना फोन केला. ‘मी मिरज बस स्थानकावर आली आहे. तुम्हाला सरप्राईझ द्यायचे आहे’, असे म्हणून तिने पुन्हा फोन केला.

त्यानंतर घेरडे हे मिरज बस स्थानकात गेले. ‘आपण नरसोबाच्या वाडीत जाऊन बोलू’ असे सांगून ती त्यांच्या कारमध्ये बसली. त्यानंतर तेथे अन्य चार पुरूष आले. ‘आमच्या बहिणीला कोठे घेऊन चालला आहे,’ असे विचारून त्यांना धमकावले. ‘प्रकरण मिटवायचे असेल तर 2 लाख रूपये दे’ अशी मागणी त्यांनी केली.

[amazon_link asins=’B01G5I8YLC,B016EOZ7OO’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’96d104f7-cef5-11e8-a4a5-cbe7fccbe4a3′]
त्यानंतर घेरडे यांनी एटीएममधून 80 हजार रूपये काढून दिले. 1 लाख रूपयांचा धनादेश घेतला. उर्वरित 20 हजार रूपये नंतर देण्याचे ठरले आणि तेथून ते सर्वजण गेले. त्यानंतर घेरडे यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आज याप्रक़रणी शिंदे याला अटक केली. त्याच्याकडून सहा हजार रूपये जप्त केले. अन्य संशयित फरारी असल्याचे सांगण्यात आले.