झाडावर बनावट ‘माकड’ पाहून लंगुरांनी केलं ‘असं’ काही, नंतर केला त्याच्या मृत्यूचा ‘शोक’ (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाईन टीम : एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, जो मोठ्या संख्येने शेअर केला जात आहे. वानरांच्या कळपाला एक माकड दिसते. हे माकड बनावट होते, परंतु त्यांना हे माकड खरे असल्याचे आढळले आणि वानर येऊन त्याच्या जवळ बसले. व्हिडिओच्या शेवटी असे दाखविले जात आहे की, वानर शेवटी माकडच्या मृत्यूचे शोक करीत आहेत.

व्हिडिओमध्ये दिसून येते की, वानरांच्या कळपाला झाडावर बनावट माकड दिसते. एक वानर जाऊन त्याची शेपटी खेचतो. वानर पाहतो कि त्या माकडाचे डोळे चमकत आहेत. तो जवळ येऊन त्याला पकडतो आणि माकड खाली पडतो. एक वानर त्याला पकडून रिकाम्या जागी घेऊन जातो आणि त्याचा वास घेण्यास सुरवात करतो. माकडाचा मृत्यू झाल्याचे त्याला समजले. वानरांचा एक कळप तेथे येतो आणि त्याच्या मृत्यूबद्दल शोक करतो.

व्हिडिओ सामायिक करताना सुशांत नंदाने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “जेव्हा प्राणी अशी करुणा दाखवतात. हे समजणे कठीण असते कि, मनुष्य एकमेकांना कसे मारू शकतात” दरम्यान, हा व्हिडिओ 2 मार्च रोजी सामायिक केला गेला होता. ज्याचे आतापर्यंत 3 हजाराहून अधिक व्ह्यूज आहेत. तसेच, 400 हून अधिक लाईक्स आणि 150 री-ट्वीट केले गेले आहेत. ट्विटरवर लोकांनी या व्हिडिओला अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत.