लॅपटॉप, मोबाईल चोरी करणारे अटकेत

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन – चिंचवड पोलिसांनी अटक केलेल्या चोरट्याकडून लॅपटॉप, मोबाईल असा तीन लाख दहा हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. संदेश प्रभाकर पाटोळे (२०), प्रविण सुरेश बोरसे (२९, दोघे रा. बिजलीनगर चिंचवड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदेश हा पॅकर्स लेबर आहे. तर प्रवीण हा नोकरी करतो. चिंचवड पोलिसांनी संशयावरून ताब्यात घेतले. त्यांच्याजवळ असलेल्या बॅगेची झडती घतली असता त्यामध्ये एक लॅपटॉप व आठ मोबाईल फोन सापडले. याबाबत विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवाची उत्तरे दिली. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी आकुर्डी, वाल्हेकरवाडी, चिंचवड या भागातून दुचाकीचा वापर करुन घरातून, गाडीच्या डिक्कीतून असे एकूण १८ मोबाईल चोरल्याचे कबुल केले.

ही कारवाई वरीष्ठ पोलीस निरीक्षक भिमराव शिंगाडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विश्‍वजीत खुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत जाधव, पोलीस उपनिरीक्षक डिगे, पोलीस कर्मचारी पांडुरंग जगताप, गोकावी, राजेंद्र शिरसाट, विजयकुमार आखाडे, शेलार, हृषीकेश पाटील, अमोल माने, पंकज बदाने, गोविंद डोके, माळी यांच्या पथकाने केली आहे.

ह्याही बातम्या वाचा –

साप चावल्याने ६ वर्षीय बालकाचा मृत्यू

भोसरी पोलिसांनी केला २.२५ लाखाचा ऐवज जप्त

फुल विक्रेत्यांकडून ग्राहकावर कोयत्याने वार

उसने घेतलेले पैसे वेळेत देता न आल्याने, सख्या बहिणींनी केले विष प्राशन