लोणीकंद पोलिसांकडून अवैध गावठी दारू अड्डयांवर मोठी कारवाई

वाघोली : पोलीसनामा ऑनलाइन ( कल्याण साबळे पाटील) – लोणीकंद (ता. हवेली )पोलीस स्टेशन हद्दीतील गेल्या काही दिवसापासून अवैध धंद्यानी सुळसुळात मांडला असतानाच लोणिकंद पोलिसाकडून हद्दीत अवैध रित्या हातभटटी दारू तयार करणे तसेच विक्री करणाऱ्यावर कारवाई करण्यात आली.

या कारवाई दरम्यान वडगाव शिंदे, तुळापूर, पेरणे, वाडेबोल्हाई, सास्टे, वाडेगाव, कोलवडी, केसनंद या ठिकाणी जावून कारवाई करण्यात आली. तर 9 गुन्हे देखील दाखल करण्यात आले असून सुमारे 15000 लिटर दारू बनवण्याचे रसायन अंदाजे किंमत 150000 रुपये तर 70 लिटर तयार दारु अंदाजे किंमत 4000 रुपये असा ऐकून 1,54,000 रुपयांचा माल नष्ट केला गेला. कारवाईत दरम्यान 6 आरोपीस अटक करण्यात आलेली असून 3 आरोपी फरार आहेत. पुढील तपास लोणीकंद पोलिस करत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

You might also like